28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमनोरंजनमॅगीनंतर आता अंडयावर प्रयोग: वेफर ऑमलेटची रेसिपी पाहून खवय्ये संतापले; सोशल व्हायरल

मॅगीनंतर आता अंडयावर प्रयोग: वेफर ऑमलेटची रेसिपी पाहून खवय्ये संतापले; सोशल व्हायरल

अंडे हे सुपरफूड आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे अंड्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लहाणग्यांपासून ते  वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे खाणे आहे. अंड्यापासून आपण अनेक पदार्थ तयार करू शकतो. अगदी अंड आपण उकडून खाऊ शकतो. ऑमलेट खाऊ शकतो. अंड्यापासून विविध प्रकारच्या बिर्याणी तयार करता येतात. मात्र गेल्या काही काळात सोशल मिडीयावर दाखविले गेलेले हलका-फुलका स्नॅक्स मॅगीवर जितके प्रयोग झाले त्यात आता अंड्याचाही नंबर आघाडीवर आहे. या दोनही पदार्थावर झालेले प्रयोग इतर दुसऱ्या कुठल्याच गोष्टीवर झाले नसतील.

विशेषतः शेकडो रेसिपीस उपलब्ध असताना सुद्धा एका व्यक्तीनं अंड्यापासून भलत्याच पदार्थाची निर्मिती केली आहे. त्यानं चक्क वेफर ऑमलेट तयार केलंय. हे अजब ऑमलेट खरंच चवीला चांगल लागत का? या ऑमलेटची रेसिपी पाहून खवय्ये पार संतापले आहेत. आधी मॅगीला पकडलं होतं आता अंड्याला पकडा असं म्हणत या ऑमलेटची खिल्ली उडवली जात आहे, अशी नाराजगी त्यांनी व्यक्त केली आहे.

दी ग्रेट इंडियन फूडी या तीनशे पंच्याहत्तरपेक्षा अधिक इनस्टाग्राम फॉलोवर्स असलेल्या वापरकर्त्याने मॅक्स लेजने भरलेले हे कुरकुरीत आणि मसालेदार ऑम्लेट प्रत्येक अंडीप्रेमीला नक्कीच भुरळ पाडेल! अशा मथळ्याखाली अंड्याच्या रेसेपीचा पोस्ट शेअर केला होता.

यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत एक वापरकर्त्याने लिहिले की, सर्व भारतीय स्ट्रीट फूड विक्रेते अन्न बनवण्याचे सर्वात हानिकारक मार्ग का शोधतात. तर आणखी एकाने कमेन्ट करत लिहीले की, साधे ऑम्लेट जास्त चांगले आहे. ऑम्लेटमध्ये चिप्स? हे सर्व काय आहे? हे कोणीही खाणार नाही. तर एकाने लिहिले, आधी मॅगीला पकडलं होतं आता अंड्याला पकडा वाट लावून टाका.

हे सुद्धा वाचा :

Health Tips : थंडीच्या दिवसांत शरीर गरम ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन आवश्यक, वाचा सविस्तर

महिलांनो केसांंच्या समस्यांमुळे त्रस्त आहात? ‘हे’ आहेत काही खास उपाय

Egg Prices :अंडी दर घसरल्याने कुक्कुटपालन व्यवसायाचे नुकसान

सध्याच्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्तीसह शरीर आतून उबदार असणे खूप महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टींची खात्री करण्यासाठी अंडी महत्वाचे कार्य करते. अंड्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्वे असतात, त्यामुळे याला सुपरफूड असेही म्हणतात. अनेक आरोग्य फायदे असून कच्चे अंडे देखील औषधाचे काम करते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी