29 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरमनोरंजनइंस्टाग्रामवर नयनताराला मिळाले पाच लाख फॉलोवर्स

इंस्टाग्रामवर नयनताराला मिळाले पाच लाख फॉलोवर्स

‘जवान’ चित्रपटानं जगभरात ५२० कोटीहून अधिक कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने ३०० कोटीहून अधिक रुपये कमावले आहेत. या चित्रपटाच्या कमाईचे नवनवीन रेकॉर्ड तयार होत असताना, अभिनेत्री नयनताराला काही दिवसातच इंस्टाग्रामवर पाच लाख फॉलोवर्स मिळाले आहेत.
‘जवान’ चित्रपटाला प्रदर्शित होण्यास आठवडा शिल्लक असताना ३१ ऑगस्टला नयनताराचं इंस्टाग्रामवर आगमन झालं. इंस्टाग्रामवर येताच नयनतारानं पती विघ्नेश शिवन, शाहरुख खान, दिग्दर्शक अटली कुमार, संगीतकार अनिरुद्ध यांना फॉलो केलं. इंस्टाग्रामच्या माध्यमातून नयनतारांनं पहिल्यांदाच जगासमोर आपल्या दोन जुळ्या मुलांना दाखवलं. उयीर आणि उलग या दोन्ही मुलांसह नयनतारानं व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केला. ‘जवान’ चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर्सही नयनतारा पोस्ट करत होती. दोन दिवसातच नयनताराला १ लाख फॉलोवर्स मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)

आठवडाभरापूर्वी नयनतारांचा पती विघ्नेशनं उयीर आणि उलग यांचा अजून एक नवा फोटो पोस्ट केला. कृष्ण जयंतीच्या शुभेच्छा देत आमच्या दोन छोट्या कृष्णांना भरपूर प्रेम द्या, अशी प्रेमळ पोस्ट देत नयनतारा टॅग केलं. सध्या नयनतारा समानता रथ प्रभू, तापसी पन्नू, आलिया भट प्रियंका चोप्रा, ‘जवान’ चित्रपटाची सहनायिका सानिया मल्होत्रा ते हॉलीवुड अभिनेत्री जेनिफर लुफ्सला फॉलो करतेय.

नयनतारा सध्या कोणत्याही नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त नाहीये. तिनं आपल्या दोन लहान मुलांकडे लक्ष देण्यास प्राधान्य दिलं आहे. ‘जवान’ शूटिंग सुरू असतानाच नयनतारा आणि विघ्नेश शिगवनं यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही महिन्यातच नयनतारानं सरोगसीच्या मदतीने दोन जुळ्या मुलांचं मातृत्व स्वीकारलं. जवानच्या मुंबईतील शूटसाठी नयनतारा आणि विघ्नेश आपल्या दोन्ही तान्हूल्यांना मुंबईतही घेऊन आले होते.
हे ही वाचा 
नयनतारा लवकरच नवा बिझनेस सुरू करणार आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा फोटो पोस्ट करत तीनं स्किन केअर बिजनेस सुरु करत असल्याचे संकेत दिले. स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा, अशी पोस्ट तिनं लिहिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी