29 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरमहाराष्ट्रगणेशोत्सव 2023: शेजारी राज्यांना 'या' जिल्ह्यातील मूर्तिकार पाठवत आहेत दीड लाख गणेश...

गणेशोत्सव 2023: शेजारी राज्यांना ‘या’ जिल्ह्यातील मूर्तिकार पाठवत आहेत दीड लाख गणेश मूर्ती

कोल्हापूर जिल्ह्यातून यंदा दीड लाखाहून अधिक गणेश मूर्ती गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश तेलंगणाकडे जाणार आहेत.  एकट्या कोल्हापुरात जवळपास दहा लाख गणेश मूर्ती तयार झाल्या आहेत. या दहा लाख गणेश मूर्ती स्थानिक पातळीवर विकल्या जाणार आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात गणपती मूर्तीचा व्यवसाय तेजीत सुरू असल्याची आनंद वार्ता मूर्तिकारांनी दिली.
जून महिन्यातच कोल्हापूरत गणपती फॅक्टरी मधून सर्व आकारातील गणपती मूर्ती बाजारात दाखल झाल्या. या मूर्तींवर बाजारपेठेतच रंगकाम करत मूर्तिकार आपल्या कामाची जाहिरात करत होते. सध्या कोल्हापुरात दहा हजार गणपती मूर्तिकार आहेत. ८ हजार २०० अधिकृत गणेश मंडळे आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून किमान मोठी दहा फूट गणपती मूर्ती आकारली जाते. मंडळे गणेश भक्तांसाठी ५ फूट छोट्या आकाराची मूर्ती घेतात. कोल्हापुरात घरगुती गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जातो. कोरोनाच्या दोन वर्षात गणपती विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. यंदाच्या वर्षात बाप्पा पावल्याचं समाधान मूर्तीकरांनी व्यक्त केलं.
कोल्हापूर जिल्हा राज्याच्या दक्षिणेकडे येतो. गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाला गणपतीमूर्ती वाहतुकीसाठी कोल्हापूर जिल्हा जवळ पडतो. महाराष्ट्राखालोखाल गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात गणपती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गणपती उत्सवाच्या आठवड्यावर अगोदरच शेजारील राज्यांना गणपती मूर्ती पाठवल्या जातात.
हे ही वाचा 
एक फूट पीओपीची मूर्ती हजार रुपये दराने आकारली जात आहे. मोठ्या शहरांच्या तुलनेत कोल्हापुरात स्वस्त दराने गणपती मूर्ती विकल्या जातात. सातारा ते सोलापूर पट्ट्यातील घरगुती गणेशमूर्तींसाठीही कोल्हापुरातील गणपती मूर्तींना पसंती दिली जाते. स्थानिक बाजारपेठेत शाडूच्या मूर्तींना जास्त प्राधान्य दिले जाते. पर्यावरण पूरक शाडूची मूर्ती वजनाने जड असल्याने लांबच्या प्रवासासाठी पीओपी मूर्तींना जास्त मागणी असते. यंदा पीओपी मूर्ती मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यांना पुरवल्याचे मूर्तिकारांनी मान्य केलं .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी