32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमनोरंजनकोट्यवधींची गाडी सोडून साराने केला सर्वसामान्यांसारखा मेट्रोचा प्रवास; पाहा व्हिडिओ

कोट्यवधींची गाडी सोडून साराने केला सर्वसामान्यांसारखा मेट्रोचा प्रवास; पाहा व्हिडिओ

बॉलिवूडमध्ये आपल्या बिनधास्तपणासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सारा अली खान नुकतीच मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसून आली. या सुखकर प्रवासाचा व्हिडीओ देखील तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. श्रीमंत घरातील असूनही अत्यंत साधी राहणारी, मनमिळावू अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. सारा सोशल मीडियावर सक्रिय आहे. आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बाबतची माहिती नेहमीच शेअर करते. सारा अनेकदा ती पब्लिक प्लेसमध्येही दिसली. पुन्हा एकदा ती सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.

मुंबईत मेट्रोमध्ये प्रवास करताना साराने पांढरा कुर्ता आणि चष्मा परिधान केलेल्या, साराने हसतमुखपणे कॅमेऱ्याकडे पाहात अभिवादन केले. ‘लाइफ इन अ… मेट्रो’ चित्रपटातील गाण्यावर आधारित शीर्षक – ‘मुंबई मेरी जान… तुमच्या आधी मी मुंबई मेट्रोमध्ये असेन असे वाटले नव्हते,’ असे तिने तिच्या ‘मेट्रो इन दिनो’ सहकलाकार आदित्य रॉय कपूर आणि दिग्दर्शक अनुराग बसू यांना टॅग करत पोस्टला कॅप्शन दिले आहे. मुख्यतः सारा खानचा मेट्रो इन दिनो हा चित्रपट निर्माणाधिन आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by laybhari (@laybhariofficial)

साराने ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केली आहे, असे दिसते आहे. मेट्रो इन दिनो चित्रपटाबद्दल अधिक सांगायचे झाले तर, ‘मेट्रो…इन दिनो ही लोकांची कथा आहे, असे अनुराग बसू यांनी आधी सांगितले होते. ‘लाइफ इन अ… मेट्रो’ या चित्रपटामधील ‘इन दिनो’ या लोकप्रिय गाण्यावरून या चित्रपटाचे शीर्षक देण्यात आले आहे. हा चित्रपट समकालीन काळातील मानवी नातेसंबंधांच्या कडू-गोड कथा दाखवेल. या काव्यमय चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अनुपम खेर, अली फजल आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका असतील.

हे सुद्धा वाचा :

ऐकावे ते नवलच! दक्षिणात्य चाहत्याने अभिनेत्री समंथा प्रभूच्या नावाने बांधले मंदिर

खेल खतम, पैसा हजम: ट्विटरकडून अमिताभ बच्चन यांची फसवणूक?

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना इंस्टाग्रामवरील ‘या’ फोटोमुळे झाली ट्रोल

Sara ali khan travel by metro like a normal person, watch the video

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी