31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयमाझ्या रक्ताने लिहून देतो, कर्नाटकात काँग्रेस 150 जागा जिंकणार : डी.के. शिवकुमार

माझ्या रक्ताने लिहून देतो, कर्नाटकात काँग्रेस 150 जागा जिंकणार : डी.के. शिवकुमार

कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा रणसंग्राम दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असून सत्ताधारी भाजपसमोर काँग्रेसने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कर्नाटकात काँग्रेस 150 जागा जिंकेल, हे मी माझ्या रक्ताने लिहून देऊ शकतो, असे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार बुधवारी म्हणाले.

भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी म्हटले होते की, माजी मुख्यमंत्री जगदिश शेट्टर हे हुबळी-धारवाड मतदारसंघातून पराभूत होतील हे मी माझ्या रक्ताने लिहून देतो. शेट्टर यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टर यांचे तिकीट भाजपने कापल्यामुळे ते नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. ते हुबळी-धारवाड मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत.

बीएस येडीयुरप्पा यांच्या विधानावर पत्रकारांशी बोलताना डी.के. शिवकुमार म्हणाले, मी माझ्या रक्ताने लिहून देऊ शकतो, कर्नाटकात शेट्टर यांच्या जागेसह काँग्रेस 150 जागांवर जिंकेल. कर्नाटकात पुढचे सरकार आमचेच असेल असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. अन्यायकारी आणि जनतेला खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपला आम्ही धुळ चारु असे देखील डी.के. शिवकुमार यावेळी बोलताना म्हणाले.

भाजपकडून शिवकुमार यांना लक्ष्य केले जात असल्याच्या तसेच त्यांच्या विरोधात कनकपूरा येथून माजी महसूल मंत्री आर. अशोक यांना पाठबळ देण्याच्या मुद्द्यावर बोलतांना ते म्हणाले, भाजपच्या डावपेचांना आम्ही घाबरत नाही, त्यांना काहीही करुद्या आम्ही आमचे लक्ष विचलीत होणार नाही.

हे सुद्धा वाचा

ऐकावे ते नवलच! दक्षिणात्य चाहत्याने अभिनेत्री समंथा प्रभूच्या नावाने बांधले मंदिर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आप्पासाहेब धर्माधिकारींवर गुन्हा दाखल करा; खारघर उष्माघात मृत्यूप्रकरणी याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 11 वाहनांचा विचित्र अपघात

महत्त्वाचे म्हणजे, डी.के. शिवकुमार यांचे बंधू डी.के. सुरेश यांनी देखील कनकपूरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जर डी.के. शिवकुमार यांचा अर्ज बाद झाला, तर डी.के. शिवकुमार यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्याचे काँग्रेसचे धोरण होते. मात्र शिवकुमार यांचा अर्ज स्विकारला गेला असून शिवकुमार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी