33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमनोरंजन'मी नथुराम गोडसे बोलयतोय'... शरद पोंक्षे यांच्या नाटकाचे राज्यात प्रयोग

‘मी नथुराम गोडसे बोलयतोय’… शरद पोंक्षे यांच्या नाटकाचे राज्यात प्रयोग

गेल्या काही दशकांपासून रंगभूमीवर चर्चेत असलेले चतुरस्त्र अभिनेते शरद पोंक्षे यांचे मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे काही प्रयोग मुंबई, ठाण्यात होणार आहेत. खास लोकाग्रहास्तव या नाटकाचे 50 प्रयोग होणार आहेत. प्रदीप दळवी लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित या नाटकाचे आजअखेर या नाटकाचे हजारो प्रयोग झाले आहेत.

माऊली भगवती मोरया निर्मित मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे दिनांक 7 ऑक्टोंबर रोजीपासून प्रयोग सुरु होत आहेत. 7 रोजी दुपारी गडकरी रंगायतन येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 8 रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरीवली येथे दुपारी सव्वाचार वाजता प्रयोग होणार आहे. तर शिवाजी मंदीर दादर येथे दि. 9 रोजी सायंकाळी साडेसात वाजता या नाटकाचा प्रयोग होणार असल्याची माहिती अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकांऊंटवरुन दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात दि. 20,21,22,23 रोजी सलग चार प्रयोग पुण्यात होणार असून त्याची ऑनलाईन तिकीटविक्री देखील सुरु झालेली आहे.

हे सुद्धा वाचा 
लालबागच्या राजाच्या चरणी आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ कोटींचे दान! वाचा..
वर्ल्डकपआधी भारताची अग्निपरीक्षा! आजपासून बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत रंगणार वन-डे मालिका
धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, फळबागांसाठीची खते मिळणार फुकटात !

गेल्या काही वर्षांपूर्वी या नाटकाचे प्रयोग थांबविण्यात आले होते. सामाजिक, राजकीय स्थितीवर गांधींच्या भूमिकेबद्दल या नाटकात नथुराम गोडसे याच्या नजरेतून भाष्य करण्यात आले आहे. शरद पोंक्षे यांनी या नाटकात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. हिंदूत्त्ववादी विचारांनी प्रेरित असलेले शरद पोंक्षे कायमच आपल्या विचारांवर ठाम राहून आपले विचार बेधडकपणे मांडत असतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी