33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, फळबागांसाठीची खते मिळणार फुकटात !

धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, फळबागांसाठीची खते मिळणार फुकटात !

राज्याच्या कृषिमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी धडाडीने निर्णय घेत आहेत. राज्यात फळबागा लागवडीला चालना देण्यासाठी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. फळबागांना खतांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना अगदी मोफत खते देण्यासंबंधीचा मोठा निर्णय़ घेतला आहे. राज्यात फलोत्पादन विभागाकडून स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविली जात आहे. या योजने अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत आता ठिबक सिंचन ऐवजी आवश्यक खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय़ देखील काढण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिंबक सिंचनासाठी अनुदान देण्यात येत होते. त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून देखील अनुदान देण्यात येते. त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी हे अनुदान खतांसाठी देण्याचा निर्णय घेतला असून आवश्यक खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे, यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री मुंडे यांनी दिली.

मजुरीसाठी देखील वाढीव खर्च
राज्यातील अधिकाअधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच गरज भासल्यास शंभर कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल असे देखील त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने 06 जुलै, 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली होती. यांतर्गत 15 फळपिकांकरिता खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन 100% अनुदान देण्यात येत होते. यामध्ये आता सुधारित मापदंड लागू करण्यात आले असून मजुरीसाठी देखील वाढीव खर्च देण्यात येईल.

हे सुद्धा वाचा 
चंद्रशेखर बावनकुळेंनी गोपीचंद पडळकरांचे कान उपटले !
राजेशाही थाटाची डेक्कन ओडिसी तीन वर्षानंतर पुन्हा धावली!
धनगर आरक्षणावर अद्याप तोडगा नाहीच! सह्याद्रीवरील बैठक निष्फळ..

यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतुन मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100% अनुदान दिले जाणार असून, याबतचा शासन निर्णय काढला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी