31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराष्ट्रीयमोदींनी ओबीसींसाठी काय केले?: राहुल गांधी

मोदींनी ओबीसींसाठी काय केले?: राहुल गांधी

कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार, 22 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन 2011 साली झालेल्या जातीय जनगणनेची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी आणि ओबीसी आणि इतर दुर्बल घटकांची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी नवीन जातीय जनगणना करावी अशी मागणी केली. संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) 2010 मध्ये आणलेल्या विधेयकांतर्गत इतर मागासवर्गीय (ओबीसी) कोट्याची तरतूद करण्यात आली नसल्याची खंत यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, “जनगणनेसाठी इतका विलंब कशासाठी? आता जातीय जनगणना झाली पाहिजे. त्यासोबतच, 2011 साली झालेल्या जातीय जनगणनेची आकडेवारी एकाच वेळी जाहीर झाली पाहिजे. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर जातीय जनगणना करेल आणि त्यानंतर देशाला येथील ओबीसी, दलित आणि आदिवासींची एकूण लोकसंख्या कळेल.”

पंतप्रधान मोदी रोज ओबीसींबद्दल बोलतात पण ओबीसींसाठी काय केले जात आहे ते अद्याप समजू शकले नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, “मी संसदेत याविषयी बोललो, जर ते ओबीसींसाठी काम करतात, तर देशात 90 पैकी फक्त 3 सचिव ओबीसी का आहेत? देशाच्या अर्थसंकल्पावर हे ओबीसी अधिकारी किती आणि काय नियंत्रण ठेवत आहेत? मला समजत नाही की पंतप्रधान मोदी रोज ओबीसींबद्दल बोलतात पण त्यांनी त्यांच्यासाठी काय केले?”

हे ही वाचा 

धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, फळबागांसाठीची खते मिळणार फुकटात !

धनगर आरक्षणावर अद्याप तोडगा नाहीच! सह्याद्रीवरील बैठक निष्फळ..

चंद्रशेखर बावनकुळेंनी गोपीचंद पडळकरांचे कान उपटले !

ओबीसी खासदारांवर आरोप करत ओबीसी खासदारांना निर्जीव पुतळ्याची उपमा त्यांनी दिली. “भारतात किती ओबीसी आहेत आणि त्यांना किती सहभाग मिळतो हे मला शोधायचे आहे. ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीएवढा वाटा मिळायला हवा. तुम्ही भाजपच्या कोणत्याही खासदाराला विचारा की तो काही निर्णय घेतो का? कायदा बनवण्याच्या कामात सहभागी होता का? OBC खासदारांना पुतळा बनवले गेले आहे, त्यांच्याकडे अजिबात सत्ता नाही,”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी