31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमनोरंजनShivpratap Garudjhep : दसऱ्याच्या दिवशी अमोल कोल्हेंनी घेतलेली 'गरूडझेप' यशस्वी!

Shivpratap Garudjhep : दसऱ्याच्या दिवशी अमोल कोल्हेंनी घेतलेली ‘गरूडझेप’ यशस्वी!

डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने नटलेला शिवप्रताप गरूडझेप हा चित्रपटदेखील सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शिवरायांच्या चरित्रातील आग्रा भेटीचा प्रसंग उलघडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.

महाराष्ट्राचा किंबहुना भारताचा इतिहास अभ्यासायचा म्हंटलं तर एक नाव न राहता समोर येतं ते म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. याच छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातून अनेकदा सर्वांनाच प्रेरणा मिळत असते. त्यामुळेच सध्या त्यांच्या चरित्रावर मोठ्या प्रमाणावर चित्रपट तयार होत आहेत. आपल्या अभिनय शैलीतून छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी पोहचवणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने नटलेला ‘शिवप्रताप गरूडझेप’ हा चित्रपटदेखील सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतून महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले आणि छत्रपुती शिवाजी महाराजांची भुमिका म्हणजेच अमोल कोल्हे असे समीकरण तयार करणारे कोल्हे यांनी शिवरायांच्या चरित्रातील आग्रा भेटीचा प्रसंग उलघडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.

चित्रपटात महाराजांची आणि औरंगजेबाची आग्रा भेट आणि शिवरायांनी चातूर्याच्या जोरावर केलेले पलायन या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी अमोल कोल्हे यांच्या समोर औरंगजेबाच्या भुमिकेत पुन्हा एकदा यतीन कार्येकर यांनी उत्तम अभिनय केला आहे. शिवाय दिग्दर्शक कार्तिक केंडे यांनी अनेक गरजेच्या ठिकाणी VFXचा योग्य वापर केला असल्याचा दिसून येत आहे. एकंदरीतचं शिवप्रेमी आणि ऐतिहासिक सिनेमा पाहण्याची आवड असणाऱ्या रसिक प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल अशी अपेक्षा आहे. मात्र, अमोल कोल्हे यांच्या लौकिकाला शोभेल अशी कथा आणि संवाद लेखन या सर्व गोष्टींची सिनेमात कमतरता जाणवते.

हे सुद्धा वाचा

Mumbai News : उद्धवाने शिवतीर्थ गाजवलं पण ठाकरे घराणं मात्र फुटलं, ठाकरे कुटुंबाचे 3 शिलेदार शिंदेंच्या मंचावर

Breaking News : दिल्ली कॅपिटल्समधील युवा खेळाडूला पोलिसांकडून अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप

Ranbir Alia : होणाऱ्या मुलासाठी अभिनेता रणबीर कपूरने घेतलाय महत्त्वाचा निर्णय; स्वत:च करिअर लावलंय दावणीला

चित्रपटाच्या पहिल्या भागात मध्यांतरापर्यंत घटनांची गती खूप वेगाने आहे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात झालेल्या वाटाघाटी आणि तहाची बोलणी आणखी दाखवता आली असती. शिवाय महाराजांच्या आग्र्याला प्रस्थानापर्यंत घडलेल्या घटनांचा धावता आढावा देखील दाखवण्याची संधी उपलब्ध होती. मात्र, या सर्व गोष्टींकडे दूर्लक्ष करत केवळ आग्र्यात झालेल्या घटनेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जे काही वेळानंतर थोडेफार कंटाळवाणे वाटायला लागते. शिवाय चित्रपट सुरू झाल्यापासून सिनेमाची कथा जोडण्यासाठी काहीसा वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून सिनेमातील संवादावर लक्ष केंद्रीत करणे अवघड होऊन जाते.

दरम्यान, हा सिनेमा उपलब्ध ऐतिहासिक संशोधने आणि पुस्तकांवर आधारित असल्याचे सिनेमाच्या प्रस्तावनेमध्ये सांगितले आहे. त्यामुळे उपलब्ध साहित्याचा पुरेपुर वापर केला असल्याचे अनेक ठिकाणी जाणवते. शिवाय काही प्रसंगात इतिहासाला थोडाफार मसाला लाऊन सादर केला असल्याचे देखील जाणवते. मात्र, संपूर्ण चित्रपटात अमोल कोल्हे यांनी साकारलेली भुमिका वाखाडण्याजोगी आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी