मनोरंजन

Marathi movies : ‘रुप नगर के चिते’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘रुप नगर के चिते’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ‘मैत्री’ वर आधारीत आहे. मैत्रीतला ओलावा, आनंद, आधार आशा गोष्टी या चित्रपटामध्ये अधोरेखीत झाल्या आहेत. आनंद, मनातील राग, मनातील गुपीते व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असावी लागते. त्यामुळेच आयुष्यात अर्थ प्राप्त होतो. या चित्रपटाची निर्मीती एस. एंटरटनेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली असून, दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. येत्या 16 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

हा चित्रपट प्रत्येकाला महाविद्यालयीन दिवसांची नक्कीच आठवण करुन देईल असा विश्वास चित्रपटाच्या कलाकारांनी व्यक्त केला. मैत्र‍िच्या नात्यातील आपली भावनिक गुंतवणूक सच्ची असते. जी जपणे प्रत्येकाला महत्त्वाचे असल्याचे सांगत हा चित्रपट प्रत्येकला निखळ आनंद देईल असे दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना बॉलीवूड सारखी भव्यता अनुभवायला मिळेल असेही निर्माते मनन शाह यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Brahmastra : रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Chief Minister : दोन माजी मुख्यमंत्री भेटीने, राजकारणात संशय बळावला

Ganeshotsav 2022, : ‘कुठे राज ठाकरेंचे विचार आणि कुठे हा फडतूस कार्यकर्ता…’

या चित्रपटात करण‍ परब, कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, आयुषी भावे, सना प्रभु, मुग्धा चाफेकर, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, सौरभ चौघुले, रजत कपूर हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन विहान सूर्यवंशी, कार्तिक यांनी केले आहे. तर छायांकन संतोष रेडीडी यांनी केले असून, गोरक्षनाथ खांडे यांनी संकलन केले आहे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

12 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

12 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

16 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

16 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

17 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

17 hours ago