30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeमनोरंजनMarathi movies : 'रुप नगर के चिते' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या...

Marathi movies : ‘रुप नगर के चिते’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'रुप नगर के चिते' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 'मैत्री' वर आधारीत आहे. मैत्रीतला ओलावा, आनंद, आधार आशा गोष्टी या चित्रपटामध्ये अधोरेखीत झाल्या आहेत.

‘रुप नगर के चिते’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ‘मैत्री’ वर आधारीत आहे. मैत्रीतला ओलावा, आनंद, आधार आशा गोष्टी या चित्रपटामध्ये अधोरेखीत झाल्या आहेत. आनंद, मनातील राग, मनातील गुपीते व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असावी लागते. त्यामुळेच आयुष्यात अर्थ प्राप्त होतो. या चित्रपटाची निर्मीती एस. एंटरटनेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली असून, दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. येत्या 16 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Marathi movies : 'रुप नगर के चिते' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट प्रत्येकाला महाविद्यालयीन दिवसांची नक्कीच आठवण करुन देईल असा विश्वास चित्रपटाच्या कलाकारांनी व्यक्त केला. मैत्र‍िच्या नात्यातील आपली भावनिक गुंतवणूक सच्ची असते. जी जपणे प्रत्येकाला महत्त्वाचे असल्याचे सांगत हा चित्रपट प्रत्येकला निखळ आनंद देईल असे दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना बॉलीवूड सारखी भव्यता अनुभवायला मिळेल असेही निर्माते मनन शाह यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Brahmastra : रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Chief Minister : दोन माजी मुख्यमंत्री भेटीने, राजकारणात संशय बळावला

Ganeshotsav 2022, : ‘कुठे राज ठाकरेंचे विचार आणि कुठे हा फडतूस कार्यकर्ता…’

या चित्रपटात करण‍ परब, कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, आयुषी भावे, सना प्रभु, मुग्धा चाफेकर, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, सौरभ चौघुले, रजत कपूर हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन विहान सूर्यवंशी, कार्तिक यांनी केले आहे. तर छायांकन संतोष रेडीडी यांनी केले असून, गोरक्षनाथ खांडे यांनी संकलन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी