33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रजगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, राहुल गांधीचा केंद्र सरकारला खोचक...

जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, राहुल गांधीचा केंद्र सरकारला खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लसीकरणावरून केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार टिका केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लस घेण्याचा अधिकार इंटरनेट नसणाऱ्याचाही आहे असा खोचक टोला राहुल गांधींनी केंद्र सरकारला लगावला आहे (Rahul Gandhi has accused the central government of having the right to vaccinate even those who do not have internet access).

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सतत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केंद्र सरकारवर (Central Government) टीका करत असतात. त्यांच्या ट्विट्सच्या माध्यमातून ते सरकारला प्रश्न विचारत असतात. आजच्या त्यांच्या ट्विटमध्येही त्यांनी सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर टीका केली आहे. लस घेण्याचा अधिकार इंटरनेट नसणाऱ्याचाही आहे असे राहुल गांधी म्हणाले (Rahul Gandhi said that even those without internet have the right to get vaccinated).

दुधाच्या भाववाढीसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मंत्रालयासमोर आंदोलन

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल : शरद पवार

Jharkhand, Chhattisgarh top vaccine wasters, Kerala and Bengal saved over 1 lakh doses: Centre

आपल्या ट्विटमधून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लसीकरणाआधीच्या ऑनलाईन नोंदणीवर आक्षेप घेतला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, कोरोना लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रत्येकाला लस मिळायला हवी. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नसावी. कारण जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही (The right to life belongs to those who do not have internet).

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानेही लसीकरणासाठीच्या ऑनलाईन नोंदणीच्या आवश्यकतेवर आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, नियोजन करणाऱ्यांना सत्य परिस्थितीची जाणीव असायला हवी. काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लसींचा साठा मोफत करणार असल्याची घोषणा केली. देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने (Central Government) केवळ कोविड योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती.

तर राज्यांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. परंतु, आता १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार (Central Government) मोफत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावरुनही काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे. “एक साधा प्रश्न – जर लस सर्वांसाठी विनामूल्य असेल तर खाजगी रुग्णालयांनी पैसे का घ्यावेत” असा सवाल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी