32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसफाई कामगारांच्या पगारातून ठेकेदारांची बेकायदेशीर वसुली

सफाई कामगारांच्या पगारातून ठेकेदारांची बेकायदेशीर वसुली

टीम लय भारी

मुंबई :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी सफाई कामगारांच्या (Sweepers) पगारातून (Salary) ठेकेदार (Contractor) बेकायदेशीर रक्कम वसुली करत आहेत. या संदर्भातील अनेक तक्रारारी रयत विद्यार्थी परिषदेकडे आल्या होत्या. याबाबत अनेक माहिती मिळवून घेण्यासाठी रयत विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी तिथे गेले असता त्यांच्या गंभीरबाब लक्षात आली.

रयत विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी तिथे गेले तेव्हा तेथे त्यांच्या लक्षात आले की,      पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात ठेकेदाराकडे (Contractor) सफाई कर्मचारी (Sweepers) अकुशल व कुशल कर्मचारी असे 1600 कामगार काम करत आहेत. महापालिकेने या सफई कामगारांसाठी (Sweepers) किमान वेतन निश्चित केले आहे. सफाई कामगारांना (Sweepers) एकूण वेतन १८२०० रूपये अकुशल कामगारांना २२००० रूपये तर कुशल कामगारांना २४०० रूपये वेतन आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून (Contractor) त्यांना किमान वेतन दिले जात नाही. आरोग्य विभागातील कंत्राटी महिला व पुरुष कामगारांना पगार म्हणून ११००० रूपये दिले जातात. याबाबत जर कोठे तक्रार केली तर कामगार नोकरी जाण्याच्या भीतीने अन्याय सहन करीत आहे.

जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, राहुल गांधीचा केंद्र सरकारला खोचक टोला

दुधाच्या भाववाढीसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मंत्रालयासमोर आंदोलन

Monsoon advances into seven states six days ahead of schedule, says weather department

पिंपरी-चिंचवड महानगरपालिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचारी (Sweepers) महिला व पुरुष कचरावेचक घंटागाडी नाले सफाई कर्मचारी (Sweepers) यांच्या हक्काचा पगार (Salary) म्हणून दिनांक २० ते २५ तारखेच्या दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो कायद्याच्या नियमाच्या अनुषंगाने दरमहा दहा तारखेपर्यंत सर्व कर्मचारी यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणे कायद्याच्या नियमानुसार बंधनकारक असते. मात्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या ठेकेदाराससाठी (Contractor) संपूर्ण कायदा बदलल्याचे चित्र स्पष्ट होते. जो पगार महिन्याच्या १० तारखेपर्यंत मिळणे बंधनकारक असतो तो पगार (Salary) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान का मिळतो या संबंधित लेखी खुलासा पिंपरी-चिंचवड महापालिकेने करावा.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या बँक खात्यावर जमा झालेल्या हक्काचा पगार (Salary) संबंधित पिंपरी शाखेतील बँकेत जाऊन काढावा लागतो इतर बँकेच्या कोणत्याही शाखेत काढण्याची मुभा नाही किंवा हक्काचा पगार (Salary) कोणत्या शाखेतून किंवा कधी काढायचा हा सर्वस्वी अधिकार या खातेदाराचा असतो. परंतु ठेकेदार (Contractor) सोबत झालेल्या करारनाम्यातील चुकीच्या जाचक अटीमुळे कामगारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी गंभीर बाब आहे. नियमांच्या काही जाचक अटींचा फायदा संबंधित ठेकेदार (Contractor) शुभम उद्योग यांनी उचलून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ड प्रभागातील सफाई कर्मचारी (Sweepers) महिला व पुरुष यांना पिंपरी शाखेतील सिंडिकेट बँक (कॅनरा बँक सध्याची) बँकेत बोलून ठेकेदारामार्फत विड्रॉल स्लिप भरून घेतल्या जातात.

सदर ठेकेदारांची (Contractor) व्यक्ती तिथे थांबून हे काम करून घेते. रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरोदे, सचिव रविराज काळे, अक्षय कोथिंबीरे यांनी सदर गोष्टीचा पाठपुरावा केला. तसेच यावर लवकरात लवकर कारवाई करावी नाहीतर आंदोलनाला सामोरे जाऊ असा इशारा रयत विद्यार्थी परिषदेकडून देण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी