28.2 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रमाण - खटावमध्ये मतदारांच्या हातात डुप्लीकेट नोटा

माण – खटावमध्ये मतदारांच्या हातात डुप्लीकेट नोटा

सातारा : माण – खटावमध्ये प्रभाकर देशमुख यांना मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मतदारांना भुलवण्यासाठी विरोधकांनी काळेगोरे प्रकार केले आहे. त्यासाठी चक्क डुप्लीकेट नोटा मतदारांच्या हातावर टेकविण्यात आल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.

हुशार, विदवान, बुद्धिमान, कार्यक्षम असलेले उमेदवार प्रभाकर देशमुख यांना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नैतिक मार्गाने मतदारांना आपलेसे करण्यात अनेक उमेदवारांना अपयश येत आहे. त्यामुळे काही गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांनी चक्क खोट्या नोटा मतदारांना दिल्या आहेत. यांत दोन हजार व पाचशे रूपयांच्या खोट्या नोटांचा समावेश आहे. गुंड उमेदवारांचे गावगुंड कार्यकर्ते शुक्रवारी रात्रभर मतदारांना या खोट्या नोटा देण्याचे ‘पुण्य’कर्म करीत होते. हे खोटे ‘पुण्य’कर्म शनिवारी व रविवारी सुद्धा करण्याचे वेळापत्रक आखले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘खोटे’पणाला बळी पडू नका

गेल्या दहा वर्षात माण – खटाव तालुक्याचा बिहार झाला आहे. या दोन्ही तालुक्यातील पुढाऱ्यांच्या काळ्या कृत्यांनी माण तालुक्यात गुंडगिरीचा मोठा ‘विकास’ झाला आहे. त्यामुळे हे अनैतिक पुढारी आता खुर्चीसाठी मतदारांना भुलवत आहेत. त्यासाठीच मतदारांना खोट्या नोटा दिल्या जात आहेत. मतदारांनी अशा खोटेपणाला बळी पडू नये, असे आवाहन प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी