31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनचक्क एका संस्थापकाने स्वत:ला थोबाडीत मारण्यासाठी महिलेला ठेवले कामावर

चक्क एका संस्थापकाने स्वत:ला थोबाडीत मारण्यासाठी महिलेला ठेवले कामावर

टीम लय भारी

एका कंपनीत वेगवेगळ्या कामांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. परंतु, तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, चक्क एका संस्थापकाने स्वत:ला थोबाडीत मारण्यासाठी एका महिलेला कामावर नियुक्त केले आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील ब्लॉगर आणि वेअरेबल डिव्हाइसेस कंपनीचे संस्थापक मनिष सेठी यांनी हा अजब निर्णय घेतला आहे (Founder hired a woman to slap himself).

मनिष सेठी जेव्हा फेसबुक साईट उघडतील तेव्हा ती महिला त्यांच्या कानशिलात लगावेल. फक्त या कामासाठी त्या महिलेला मनिष यांनी ठेवले आहे. या कामासाठी संबंधित महिलेला प्रत्येक तासासाठी 8 डॉलर्स मिळतात. संबंधित महिलेला अमेरिकेतील क्लासिफाइड असलेल्या क्रेगलिस्टच्या माध्यमातून निवडण्यात आले आहे.

कतरिना आणि विकी कौशल लग्नानंतर हनीमूनला जाणार नाही?

टी 20 वर्ल्डकप 2021 : हार्दिक पंड्याची क्रिकेट प्रेमींसाठी भावनिक पोस्ट

 

सेठी यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहीले आहे की, करा नावाच्या महिलेला कामावर घेतल्यानंतर त्यांची काम करण्याची क्षमता ही 35-40%  वरून 98% पर्यंत वाढली. सेठी यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, 64MP बॅक, 50MP फ्रंट कॅमेरासह जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Entrepreneur Hires Woman To Slap Him Whenever He’s On Facebook; Elon Musk Reacts

खुद्द अब्जाधीश असलेले इलॉन मस्क यांनी या व्हिडिओवर कमेंट केली आहे. इलॉन मस्क यांनी आगीचे इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी