31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनकतरिना आणि विकी कौशल लग्नानंतर हनीमूनला जाणार नाही?

कतरिना आणि विकी कौशल लग्नानंतर हनीमूनला जाणार नाही?

टीम लय भारी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत(Katrina and Vicky Kaushal won’t go honeymoon after marriage?)

त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. त्यात त्यांचा रोका झाल्याचे ही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता ते दोघे लग्नानंतर हनीमूनला जाणार नाही अशा चर्चा सुरु आहेत.

लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, कंगनाचा पद्मश्री काढून घ्या; नवाब मलिक संतापले

भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली, नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

सध्या कतरिना तिच्या प्रोजेक्टची सगळी काम लवकरात लवकर संपव्याचा प्रयत्न करत आहे. तर कतरिना अजून कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली नाही. एवढंच काय तर करिनाच्या लग्नासाठी सलमानने टायगर ३ च्या चित्रीकरणाच्या तारिखा पुढे ढकलल्या आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कतरिना आणि विकी लग्नानंतर हनिमून ब्रेकला जाणार नाहीत. कारण, दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. यामुळे दोघेही हनिमूनला जाणार नाहीत. दोघांच्याही हातात सध्या नवे प्रोजेक्ट आहेत. दोघेही चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत.

भारतीय कंपनी लाँच करणार 16 इलेक्ट्रिक कार, 3000 कोटींच्या गुंतवणूकीची घोषणा

Katrina Kaif and Vicky Kaushal set to tie the knot at THIS Rajasthan fort: Report

दरम्यान, नुकताच कतरिनाचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा उधम सिंग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी