30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यअक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण भरपूर असते(Benefits of eating walnuts). अक्रोडला ब्रेन फूड असेही म्हणतात. मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर ठरते. अक्रोडमध्ये उच्च प्रतीचे अँटी-ऑक्सिडेंट, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, मेलाटोनिन, पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन-E असे अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. यामुळे हृदयविकार, मधुमेह, कँसर होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.  दररोज अक्रोड खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, वजन आटोक्यात राहते, वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. त्यामुळे हृदयविकार दूर राहण्यास मदत होते. डायबेटिस रुग्णांसाठी अक्रोड खाणे उपयुक्त असते. यामुळे स्मरणशक्ती वाढते तसेच कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. अक्रोड मध्ये ओमेगा ३ म्हणजेच फॅटी ऍसिड चे प्रमाण जास्त असल्यामुळे ऋद्य विकाराचा धोका कमी होतो. दरोरोज अक्रोड खाण्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर , प्रोटेस्ट कॅन्सर आणि मलाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो अक्रोड खाण्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते व डायबिटीस चा धोका देखील कमी होतो दरोरोज अक्रोड खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते हाय ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक , स्ट्रोक आणि किडन्या निकामी होण्याचा धोका असतो त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये ठेवणे गरजेचे आहे

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी