30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeराजकीयठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर' भाजपच्या आरोपाने खळबळ

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे गटाच्या जाहिरातींवरतीं आक्षेप नोंदवला आहे. जाणून घ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नेमकं काय म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी असो किंवा विरोधक असो सर्वच पक्षांकडून आपल्या जाहिराती करण्यात येत आहे. अशाच प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा जाहिराती सुरू आहेत. मात्र, या जाहिरातींवरतीं भाजपने आक्षेप नोंदवला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे गटाच्या (Thackeray group) जाहिरातींवरतीं आक्षेप नोंदवला आहे. जाणून घ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नेमकं काय म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी असो किंवा विरोधक असो सर्वच पक्षांकडून आपल्या जाहिराती करण्यात येत आहे. अशाच प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा जाहिराती सुरू आहेत. मात्र, या जाहिरातींवरतीं भाजपने आक्षेप नोंदवला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर (Thackeray group) गंभीर आरोप (BJP alleges) केला आहे.(BJP alleges use of star in Thackeray group ad)

ठाकरे गटाच्या जाहिरातीत चक्क पॉर्न स्टार भूमिका करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. महाराष्ट्रा तील एक महिला, स्त्री, आई, मुलगी म्हणून माझी मान शरमेने खाली गेली आहे अशी घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात घडली आहे. या निवडणुकीच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून कायम महिलांचा अपमान केला गेला. कुठल्याही प्रकारे महिलांचा अपमान करण्याची एकही संधी उद्धव ठाकरेंचे चेले सोडत नाहीत.चित्रा वाघ म्हणाल्या आता महाराष्ट्रा त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पब, पार्टी आणि पॉर्न अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार केला आहे. ठाकरे गटाच्या ज्या जाहिराती सुरू आहेत… त्या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या जाहिरातीमधील पात्र हे पॉर्न स्टार आहे. चित्रा वाघ यांनी पुढे म्हटलं,

महाराष्ट्रात पब, पार्टी आणि पॉर्न अशा नवीन संस्कृती आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीमधील पात्र हा पॉर्न स्टार आहे. हा पॉर्न स्टार जाहिरातीत विचारतोय की, महिलांवरील अत्याचार कधी थांबणार. इतकेच नाही त हाच पॉर्न स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करत या जाहिरातीत बापाच्या भूमिकेत हा जो कुणी व्यक्ती आहे. तो उल्लू ऍपवर मुलींसोबत घाणेरडं कृत्य करण्याचे व्हिडिओ आहेत. त्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की, महाराष्ट्रा त पब, पार्टी आणि पॉर्न असा किळशवाणा प्रकार का आणत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रा त ही कसली संस्कृती आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. असले बाप जाहिरातीत वापरून आपण बाप असल्याचं ते महाराष्ट्रा ला दाखवणार आहेत का? असे सवाल चित्रा वाघ यांनी ठाकरेंना विचारले आहेत. इतकेच नाही तर या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत? या जाहिरातीचा आणि पब, पार्टीच्या कल्चरचा काही संबंध आहे का? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रा च्या जनतेला द्यायला हवं. हा पॉर्न स्टार लहान वयाच्या मुलींसो लीं बत अश्लील चाळे करताना दिसतोय आणि हाच म्हणतोय महिलांवरील अत्याचार कधी थांबणार. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, अशा अश्लील ऍप्सवर बंदी आणण्यात यावी म्हणजे उद्धव ठाकरेंना असले पॉर्न स्टार पुन्हा सापडणार नाहीत असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी