31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeव्हिडीओशिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे आणि नाशिकच्या जागांसाठी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा बुधवारी करण्यात आली(The Shiv Sena has so far fielded candidates on 15 seats in Maharashtra). त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला गुंता आता सुटला असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १५ जागा पदरात पाडून सरशी साधल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या वाट्याला २८ तर , राष्ट्रवादी अजित पवार गट ४ आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाट्याला १ असे जागावाटप झाले आहे. गेल्या २ दिवसात पालघरचा अपवाद वगळता अन्य मतदारसंघांचा प्रश्न सुटला आहे. त्यापैकी ठाणे मतदारसंघातून शिंदेंचे निष्ठावंत नरेश म्हस्के यांना तर नाशिकमधून विद्यमान खासदार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात भाजपची ३० ते ३२ जागा लढवण्याची योजना होती. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढे नाईलाज झाला आणि भाजपला ३ ते ४ जागांवर समझोता करावा लागला. यात अजित पवार गटाचा सध्या एकच खासदार आहे. पक्षाने ८ ते ९ जागांची मागणी केली होती .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी