31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeआरोग्य'सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया'च्या वतीने करण्यात आला 'सेरेब्रल पाल्सी' दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान 

‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने करण्यात आला ‘सेरेब्रल पाल्सी’ दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान 

‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ (Cerebral Palsy Association of India) या संस्थानी सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy ) हे मेंदूशी संबंधित दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. या साठी त्यांनी एक सन्मान सोहळा आयोजित केला. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते. तसेच, यांच्या हस्ते सेरेब्रल पाल्सी या दिव्यांगत्वाला आयुष्यभर सोबत घेवून उल्लेखणीय कार्य करणाऱ्या बुद्धीवंतांचा पुरस्कार प्रदान करत गौरव करण्यात आला. हा सन्मान सोहळा मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात करण्यात आला. (Cerebral Palsy Association of India honored individuals and organizations with cerebral palsy.) 

‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ (Cerebral Palsy Association of India) या संस्थानी सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy ) हे मेंदूशी संबंधित दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. या साठी त्यांनी एक सन्मान सोहळा आयोजित केला. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते. तसेच, यांच्या हस्ते सेरेब्रल पाल्सी या दिव्यांगत्वाला आयुष्यभर सोबत घेवून उल्लेखणीय कार्य करणाऱ्या बुद्धीवंतांचा पुरस्कार प्रदान करत गौरव करण्यात आला. हा सन्मान सोहळा मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात करण्यात आला. (Cerebral Palsy Association of India honored individuals and organizations with cerebral palsy.)

या कार्यक्रमामध्ये डॉ. काकोडकर यांच्यासह ऑक्सिस फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बीपीन सराफ, मुंबई विद्यापठाचे कुलगुरु प्राध्यापक रविंद्र कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक समीर कर्वे देखील उपस्थित होते.  यावेळी डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन, संस्थेचे विश्वस्त यशवंत मोरे, संदीप अग्रवाल आदी उपस्थित होते. सेरेब्रल पाल्सी असलेल्या काही व्यक्तींना रत्नश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Cerebral Palsy Association of India honored individuals and organizations with cerebral palsy.)

दिव्यांगांच्या मदतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांना सहाय्य करत पुढे यावे; डॉ. काकोडकरांचे आवाहन

बसवराज पैके (लातूर), अमोल वडगावकर (पुणे), डॉ. आदित्य लोहिया (नागपूर), अमित बाहेती (नागपूर), रिद्धी गडा (मुंबई) यांना रत्नश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. रिद्धी गडा हि कुठल्या कारणांमुळे आज येथे उपस्थित राहू शकली नसून, रिद्धीच्यावतीने तिच्या काकांनी हा पुरस्कार स्वीकार केला आहे. तसेच, सेरेब्रल पाल्सी असलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम करत असलेल्या राज्याच्या वेगवेगळ्या भागातील संस्थांना यावेळी उत्थान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्यामध्ये स्वयम् रिहॅबिलिटेशन ट्रस्टच्या (ठाणे) श्रेया देवळालकर (सेरेब्रल पाल्सीग्रस्त), तिची आई निता, वडील राजीव देवळालकर, लातूर येथील रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचालित संवेदना प्रकल्पाच्या डॉ. योगेश निटूरकर आणि व्यकंट लामजने, फेरो इक्वीप च्या फर्डिनांड रॉड्रिग्ज व फ्लाइड पिंटो, फिनिक्स स्पोर्टसचे संस्थापक साईनाथ हटंगडी व सचिव मिनल वागळे यांना उत्थान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्री समीर कर्वे, एक्सिस फायनान्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बिपीन सराफ व इतर मान्यवर उपस्थित होते. (Cerebral Palsy Association of India honored individuals and organizations with cerebral palsy.)

पहिल्यांदाच ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाने ग्रस्त असलेल्या पाच बुद्धिवंतांचा ‘रत्न श्री’ या पुरस्काराने ( ₹ 21 हजार रोख व सन्मानचिन्ह देवून ) गौरव करण्यात आले आहे. तर अशा प्रकारचे ‘बुद्धवंत’ घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या 4 संस्थांनाही ‘उत्थान रत्न’ पुरस्कार (₹ 25 हजार रोख व सन्मानचिन्ह ) देवून गौरविण्यात आले. (Cerebral Palsy Association of India honored individuals and organizations with cerebral palsy.)

तुम्हाला सांगते की,महाराष्ट्रात Cerebral Palsy Association of India ही Cerebral Palsy या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व समाजिक पुनर्वसन करणारी एकमेव संस्था आहे. हिची स्थापना 1968 साली प्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. नॉशीर वडिया यांनी केली आहे, संस्थेचे हे 56 वे वर्ष आहे. गेल्या 50 वर्षात दिव्यांगाना पुरस्कार देताना सेरेब्रल पाल्सी तसेच बहुदिव्यांग या प्रवर्गातील विद्यार्थी अथवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था वंचित आहेत.‘सेलेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमध्ये  डॉ रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, डॉ. सुनील भागवत, संचालक, Indian Institute of Science Education and Research, Pune. डो नंदिनी गोकुलचंद्रन, Dy Dir, Medical Services and Consultant of Regenerative Medicine. यांचा समावेश होता.

‘सेरेब्रल पाल्सी’ दिव्यांगांचा अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार गौरव

चला तर जाणून घेऊ कोणाला मिळाले पुरस्कार 

बसवराज पैके
1972 हे साल समस्त भारतीयांना दुष्काळाच्या झळा देणारं साल म्हणून ओळखलं जातं. याच वर्षात बसवराज पैके यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर चिमुरड्या बसवराज यांना रडायला आलं नाही. बसवराज यांच्या आई वडीलांनी त्यांना विविध डॉक्टरकडं नेवून दाखवलं. पण त्यावेळी उपचार पद्धत फार विकसित झाली नव्हती. त्यामुळं बसवराज यांना नक्की कोणता आजार आहे हे समजायला बराच काळ गेला.सेरेब्रल पाल्सी या विचित्र दिव्यांगत्वामुळं बसवराज यांना व्यवस्थित चालता येत नसायचं. बसवराज यांच्या जडणघडणीत त्यांच्या आई वडिलांबरोबरच आजोबा आणि पत्नीचाही मोठा वाटा आहे. आजोबांच्या दूरदृष्टीमुळे बसवराज यांनी औषध निर्माण शास्त्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर त्यांनी राज्यशास्त्रातील पदवीचंही शिक्षण पूर्ण केलं.

'सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया'च्या वतीने करण्यात आला 'सेरेब्रल पाल्सी' दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान 

औषधनिर्माण शास्त्रामुळे ‘सेरेब्रल पाल्सी’साठी आवश्यक असलेल्या उपचार पद्धती, त्यावरील औषधं यांची माहिती मिळवणं त्यांना शक्य झालं. शिक्षण घेत असताना बसवराज यांना कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेता आला नव्हता. कारण ग्रामीण भागात या दिव्यांगत्वाविषयी अधिक माहिती नव्हती.चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी लातूर येथे मेडीकलचं दुकान सुरू केलं. पण समाजसेवेमुळं आपलं पोट भरणार नाही याची कल्पना आल्याने त्यांनी औषधाच्या दुकानाचं रुपांतर जनरल स्टोअर्समध्ये केलं. बसवराज यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी श्रीशैल्या यांचाही मोठा वाटा आहे. दिव्यांग आहे हे माहित असुनदेखील श्रीशैल्या यांनी बसवराज यांच्याशी विवाह केला. त्यांच्या लग्नाला 28 वर्ष पूर्ण झालीयंत. मात्र, दोघांमध्ये बसवराज यांच्या दिव्यांगत्वामुळं कधीही वाद झाले नाहीत.

डॉ. सुकुमार आणि सुरेश पाटील या दोन मार्गदर्शकांमुळे बसवराज हे सामाजिक कार्याकडे वळले. बसवराज आता ग्रामीण भागातील सेरेब्रल पाल्सी मुलांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करतात. विविध उपचार पद्धतीची शिबिरे आयोजित करतात. कोविडच्या काळामध्ये सेरेब्रल पाल्सी दिव्यांग मुलांची थेरपी सतत चालू ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. दिव्यांगासाठीचे वैश्विक कार्ड काढण्यासाठी मदत करणे, लातूर जिल्ह्यातील व परिसरातील 1200 बौद्धिक दिव्यांगजनांचा आरोग्य विमा काढण्यासाठी मदत करणे, अगदी अशा लोकांच्या घरी रेशनिंगचे धान्य नेवून पोचविणे अशा कामांमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं आहे. आपण जे भोगलं, ती वेळ इतरांवर येवू नये म्हणून अथक परिश्रम करणाऱ्या बसवराज यांना ‘रत्न श्री’ पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटतो !

अमित बाहेती
मालेगाव येथील बाहेती कुटुंबामध्ये 1992 मध्ये अमितचा जन्म झाला. अमितचे हातपाय वाकडे होते. त्याला बोलता येत नव्हतं. समोरचा जे बोलायचा ते त्याला समाजायचं नाही. समोरच्या माणसाने केलेल्या इशाऱ्यांना त्याच्याकडून प्रतिसाद मिळायचा नाही. 1992 साली डॉक्टरांनाच या समस्येविषयी फार माहिती नव्हती. त्याच्या आई वडिलांनी मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, उदयपूर अशा विविध ठिकाणच्या डॉक्टरांकडे भेटी दिल्या. 10 वर्षात 18 शस्त्रक्रिया केल्या. पण फार फरक पडला नाही.

'सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया'च्या वतीने करण्यात आला 'सेरेब्रल पाल्सी' दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान 

अशातच अमितच्या आई वडिलांची मालेगावातच 1998  मध्ये श्री. गोकूळ देवरे यांच्याशी भेट झाली. गोकूळ देवरे विशेष मुलांच्या पुनवर्सनाचे कार्य करतात. अमितचं व्यंगत्व हा गोकूळ देवरे सरांसाठी नवीनच अनुभव होता. शाळेत येई पर्यंत अमितला काहीच बोलता येत नव्हतं. काहीच समजत नव्हतं. आधार शाळेच्या गोकुळ सरांनी व वैशाली मॅडम यांनी विशेष शाळेचा बदल नैसर्गिक शिक्षण पद्धतीत केला. त्यांनी अमितला बरीच साधने उपलब्ध करून दिली. नॅचरल स्टिम्युलेशन थेरपीचाही त्याच्यावर उपचार केला. अमितमध्ये आता मोठा बदल झाला आहे. तो उत्तम बोलतो. त्याला सर्व काही समजतं. तो क्रिकेटचा चाहता आहे. क्रिकेटची खडानखडा माहिती त्याच्याकडं आहे. तो शेअर मार्केटचा व्यवसाय करतो. Zee Business चे कार्यकारी संपादक अनिल संगवी यांचा तो चाहता आहे. शेअर बाजारातून अमित पैसे कमवित आहे. विशेष मुलांच्या विकासासाठी गोकूळ सरांनी 1000 देशी गीर गाईंचा प्रकल्प राबवलाय. या प्रकल्पात अमित व्यावसायिक पार्टनर आहे. अमितची ही जिद्द व प्रगती पाहून त्याचा ‘रत्न श्री’ पुरस्काराने गौरव करीत असताना आम्हांस त्याचा अभिमान वाटतो.

आदित्य लोहिया
MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविणं फार सोपी गोष्ट नाही. त्यातही सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील जागा मिळविणे त्याहूनही अवघड. तल्लख मेंदू असलेल्यांनाच या अभ्यासक्रमात प्रवेश मिळविता येतो. सेरेब्रल पाल्सी या व्यंगत्वामुळे अनेक शारीरिक अडचणी असून सुद्धा आदित्य संजय लोहिया याने या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविला. अकोल्यातील सरकारी महाविद्यालयातून आदित्यने MBBS अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर तो आता नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात MD चं शिक्षण घेत आहे.

'सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया'च्या वतीने करण्यात आला 'सेरेब्रल पाल्सी' दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान 

आदित्य हा आपल्या आई वडिलांचं एकुलतं एक अपत्य. सेरेब्रल पाल्सी या व्यंगत्वामुळे त्याला बालपणात व किशोर वयात फारच अडचणींचा सामना करावा लागला. अशा अडचणी इतर दिव्यांगांना भेडसावू नयेत म्हणून त्याने विद्यार्थी दशेतच सामाजिक कार्य सुरू केलं. आदित्यच्या प्रयत्नामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 20 मिनिटे जादा वेळ द्यायला सुरूवात केलीय. विद्यापीठाने त्यांच्या वेबसाईटवर दिव्यांगासाठी एक वेगळी विंडो सुरू केलीय. दिव्यांग व्यक्तींना उपचारासाठी वेळ द्यावा लागतो, त्यामुळे महाविद्यालयात 10 टक्के अनुपस्थितीची सवलतही त्याने मिळवून दिली. एम्समधील विद्यार्थ्यांनाही परीक्षेत अतिरिक्त वेळ मिळवून देण्यासाठी आदित्यने यशस्वी पाठपुरावा केला. महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्लयांमध्ये आदित्य भेटी देत असतो. दिव्यांगांचे प्रश्न समजून घेवून ते सोडविण्यासाठी तो प्रयत्न करीत असतो. बँक ऑफ इंडियामध्ये दिव्यांगाना गैरवर्तनाची वागणूक दिली जात होती. त्यासंबंधी तक्रार केल्यानंतर बँकेने सुधारणा करून तशी लेखी हमी दिली. स्वतःला ज्या अडचणी भेडसावल्या, तशा समस्या इतरांना भेडसावू नयेत म्हणून कार्य करणाऱ्या आदित्य लोहिया याचा ‘रत्न श्री’ पुरस्काराने गौरव करताना आम्हांस विशेष आनंद होत आहे.

फिनिक्स स्पोर्टस
सेरेब्रल पाल्सीसारख्या दिव्यांग व्यक्तींना शारीरिक, सामाजिक, भावनिक, मानसिक आधाराची गरज असते. ही गरज पूर्ण करण्याचं काम ‘फिनिक्स स्पोर्टस’ ही संस्था करते. निवृत्त अधिकारी श्री. साईकृष्ण हट्टंगडी यांनी ही संस्था सुरू केलीय. 2006 सालापासून ही संस्था कार्यरत आहे. हट्टंगडी यांच्या कल्पनेतून सेलेब्रल पाल्सी व अन्य दिव्यांग मुलांसाठी उन्हाळी सुट्टीत हॅंडबॉल, फुटबॉल, व्हॉलिबॉल, क्रिकेटचे सामने भरविले जातात. पावसाळ्यात कॅरम, टेबल टेनिस, इन डोअर गेम्स अशा खेळांचं आयोजन केलं जातं. फिनिक्सनं अशा मुलांसाठी गायन, वादन, नृत्य स्पर्धा भरवायलाही सुरूवात केलीय. छोट्या छोट्या सहलीही आयोजित केल्या जातात. यातील अनेक स्पर्धांमध्ये गुजरात, गोवा, औरंगाबाद येथील मुलांनी आपलं कौशल्य दाखवलंय. यामध्ये मानसिक विकलांग, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न, बहुविकलांग अशा अनेक मुलांचा सहभाग होता. 2022 पासून व्हीलचेअर हॅंडबॉल या स्पर्धेचंही नव्याने आयोजन केलं जातंय. विविध कार्यक्रमांच्या वेळी धनराज पिल्ले, अजित तेंडुलकर, दिलिप वेंगसरकर, बोमन इराणी, गायक शान, जॉनी लिव्हर अशा मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यांच्या तोंडून मुलांच्या कलागुणांचं कौतुक होतं, तेव्हा मुलंही हरखून जातात. ‘फिनिक्स स्पोर्टस’चं हे कार्य पुढ नेण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक विना मोबदला कष्ट उपसत असतात. दुर्लक्षित घटकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचं काम करणाऱ्या या ‘फिनिक्स स्पोर्टस’चा ‘उत्थान रत्न’ पुरस्काराने गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सुरेशदादा पाटील व दीपाताई पाटील यांचा एकुलता एक मुलगा मिथीलेश याला ‘सेरेब्रल पाल्सी’ हे दिव्यांगत्व आहे. त्याच्या जन्मानंतर 9 महिन्यांनी असे लक्षात आले की, मिथिलेश परावलंबी राहणार आहे. सुरेश पाटील व दीपाताई पाटील यांची लेकराप्रतीची तळमळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ओळखली. त्यातूनच स्वर्गीय किशोरपंत बापट, शरदराव घाटपांडे स्वर्गीय डॉ. नरेंद्र देसाई यांनी ‘सेलेब्रल पाल्सी विकसन केंद्रा’ची निर्मिती केली. सन 2006 मध्ये लातूर येथे हे केंद्र सुरू करण्यात आले. मिथिलेशच्या निमित्ताने सुरू झालेला हा प्रकल्प हजारो दिव्यांग मुलांसाठी फायद्याचा ठरलाय. सेरेबल पाल्सी, बौद्धीक अपंगत्व अशा विविध दिव्यांग मुलांना सर्वोतोपरी मदत करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. पाटील दांपत्याने या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगत्वाच्या कामाला वाहून घेतलंय.
दीपाताई यांनी तर त्यासाठी बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय. सेरेब्रल पाल्सी, बौद्धिक दिव्यांगत्व व इतर दिव्यांगत्व असलेल्या मुलांचा त्या स्वतःच्या लेकरांप्रमाणे सांभाळ करतात. त्यामुळे त्यांना भारत सरकारच्या नॅशनल ट्रस्टने ‘आदर्श पालक’ हा पुरस्कार देवून गौरविले आहे.

बौद्धीक दिव्यांगत्व असलेल्या 3 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही संस्था कार्य करते. 18 वर्षे वय ओलांडलेल्या मुलांसाठीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जनकल्याण दिव्यांग पुनवर्सन केंद्र सुरू केलंय.
सेरेब्रल पाल्सी हे दिव्यांगत्व असलेल्या मुलांसाठी सरकारकडून विशेष अभ्यासक्रम चालविला जातो. 2018 मध्ये संस्थेच्या हिराचंद सूळ या सेलेब्रल पाल्सी दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्याने दहावीमध्ये चक्क 94 टक्के गुण मिळविले होते.
संघाच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी आयटीआय संस्था सुरू केली आहे. महाराष्ट्रातील ही पहिली संस्था आहे. दिव्यांग मुलांच्या पालकांसाठीही विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
सेलेब्रल पाल्सी व इतर दिव्यांग प्रवर्गातील मुलांनाही समाजात जगण्याचा समान हक्क मिळवून देण्यासाठी व त्यांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या रा. स्व. संघाच्या संवेदना प्रकल्पासाठी ‘उत्थान रत्न’ हा पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे.

फेरो इक्वीप
सेरेब्रल पाल्सीसारख्या दिव्यांग व्यक्तींना शारीरिक, सामाजिक, भावनिक, मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं कुटुंबिय सुद्धा हतबल होतात. अशा दिव्यांगांनाही सामान्य लोकांप्रमाणं जीवन जगण्याची संधी मिळाली तर ते सुद्धा आनंदी, उत्साही व समाधानी दिसतील. एवढच नाही तर ते उदात्त कामगिरीही करू शकतील. दिव्यांगाचं दैनंदिन आयुष्य सुखकारक करण्यासाठी आवश्यक असलेली साधनं निर्माण करण्याचं मोठं काम ‘फेरो इक्वीप’ ही संस्था करतेय. फर्डिनांड रॉर्डिग्ज हे गेली 40 वर्षे ‘फेरो इक्वीप’च्या माध्यमातून सेलेब्रल पाल्सी व अन्य दिव्यांगासाठीचं हे मौलिक कार्य करताहेत.
बसण्याची खूर्ची, दोन चाकी सायकल किंवा तीन चाकी सायकल, मोटार सायकल, चार चाकी वाहन… अशी उपकरणं दिव्यांग व्यक्तींसाठी सोयीस्कर बनविण्याची किमया फर्डिनांड रॉर्डिग्ज करतात. संबंधित वाहन हाताने नियंत्रित करायचे की पायाने… अशी प्रत्येक दिव्यांगाची गरज वेगळी असते. या गरजेनुसार वाहनांमध्ये आमुलाग्र बदल केले जातात. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीलाही त्या वाहनांचा वापर सामान्य व्यक्तीप्रमाणे करता येतो.

स्टिफन हॉकिंग हे बुद्धिमान दिव्यांग मान्यवर भारतात आले तेव्हा त्यांच्यासाठी अलिशान चार चाकी वाहन ‘फेरो इक्वीप’नं बनविलं होतं. त्यांच्या या कार्याची महती केवळ भारतातच नाही, तर जगात पोहोचलेली आहे. त्यांना असंख्य पुरस्कार मिळालेत. लंडनच्या प्रतिनिधीगृहात मिळालेला महात्मा गांधी सन्मान त्यांच्या या कार्याची मोठी पोचपावती आहे. त्यांनी फाऊंडेशनची सुद्धा स्थापना केली असून दिव्यांग व वंचित व्यक्तींसाठी सामाजिक, शैक्षणिक असे विविध उपक्रम राबविले जातात. म्हणूनच ‘फेरो इक्वीप’ या संस्थेचा ‘उत्थान रत्न’ या पुरस्काराने गौरव करताना आम्हांस विशेष आनंद होत आहे.

रिद्धी गडा
रिद्धी चंपक गडा ही जन्मतःच सेरेब्रल पाल्सीपासून उद्भवलेल्या गंभीर समस्यांनी ग्रासलेली आहे. ती आयुष्यभर चालू शकणार नाही, उभी राहू शकणार नाही असे डॉक्टरांनी लहानपणीच सांगितलं होतं. तिच्या आई वडिलांनी मात्र तिला सर्व अधिकार व समान दर्जा मिळवून देण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं केलं. महागडे उपचारही केले. पण फारसा उपयोग झाला नाही.

'सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया'च्या वतीने करण्यात आला 'सेरेब्रल पाल्सी' दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान 

रिद्धी आता 33 वर्षाची आहे. विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला तिला आवडतं. तिनं आतापर्यंत 16 आंतरराष्ट्रीय, 14 राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय. व्हिलचेअरवरून तब्बल 30 मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रम तिनं केलाय. मॅरेथॉनमध्ये धावताना हातात फलक घेवून ती सामाजिक, शैक्षणिक संदेश देत असते. तिने 50 पेक्षा जास्त पारितोषिकं व पुरस्कार मिळवले आहेत. महाराष्ट्राचे तत्कालिन उप मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनीही त्यावेळी रिद्धीचं कौतुक केलं होतं. रासगरबा नृत्य करायला तिला आवडतं. निबंध स्पर्धेतही ती भाग घेत असते. निवडणुका जवळ आल्या की जनजागृती करून मतदारांना मतदान करण्यासाठी ती आवाहन करीत असते. रिद्धीची एक खंत आहे. कुठेही राष्ट्रगीत सुरू झालं की, या गीताचा सन्मान राखण्यासाठी तिला उभं राहता येत नाही.

तिचा भाऊ अमेरिकेत आहे. त्याच्याशी ती मोबाईलवरून नियमितपणे व्हिडीओ कॉल करून जगभरातील ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत असते. सेरेब्रल पाल्सीमुळे अनेक समस्या असूनही ती उत्साही व समाधानी राहते, आणि आपल्या परीने सामाजिक कार्यही करते. रिद्धीच्या या जिद्दीला प्रोत्साहन म्हणून तिचा ‘रत्न श्री’ या पुरस्काराने गौरव करताना आम्हांस विशेष आनंद होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी