29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeआरोग्यआहारात या दोन गोष्टींचा समावेश करा; मधुमेह आणि रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

आहारात या दोन गोष्टींचा समावेश करा; मधुमेह आणि रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

मधुमेह (Diabetes Diet) आपल्या देशाची वाढती समस्या आहे. या जगात मधुमेहींच्या गणनेमध्ये आपला दुसरा नंबर येतो. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेह असून ही फार काळजीची बाब आहे. मधुमेह आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन खास पदार्थाचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. (Diabetes Diet foods That Help You Manage Blood Sugar)

मधुमेह (Diabetes Diet) आपल्या देशाची वाढती समस्या आहे. या जगात मधुमेहींच्या गणनेमध्ये आपला दुसरा नंबर येतो. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेह असून ही फार काळजीची बाब आहे. मधुमेह आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन खास पदार्थाचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. (Diabetes Diet foods That Help You Manage Blood Sugar)

मधुमेहामध्ये आहाराची काळजी घ्यावी लागते. प्रत्येकाने आपला आहार निरोगी ठेवला पाहिजे, मधुमेहाच्या रुग्णांना पौष्टिक खाद्यपदार्थाचे सेवन करणे खूप आवश्यक आहे. मधुमेहाची पातळी नियंत्रित करण्यासाठी आपण आपला आहार सुधारला पाहिजे.

मधुमेह म्हणजे काय ते बर्‍याच लोकांना माहित नसते. म्हणूनच, ते खाण्यापिण्याची काळजी घेऊ शकत नाहीत. यासाठी मधुमेह आहार योजना घ्यावी, डॉक्टरांचा सल्ला घ्या. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण बरेचदा घरगुती उपचारांचा अवलंब करतो, परंतु आपण अशा दोन गोष्टींबद्दल बोलत आहोत ज्यामुळे मधुमेह नियंत्रित होऊ शकतो.

जाणून घ्या, कडक उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

काजु आणि खजुर हे रिकाम्या पोटी खाल्याने खुप फायद्याचे ठरतात. खजुर हा रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो तर काजु हे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो.

खजुर हे रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करते

खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. ज्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. त्यासोबतच याचे अनेक फायदेही आहेत. खजुरामध्ये आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, तांबे इत्यादी पोषक तत्वे असतात. डायबिटीस रूग्णांसाठी खजूर खाणं फायदेशीर ठरतं की नाही? तरिदेखील डायबिटीस रूग्ण १ ते २ खजूर खाऊ शकतात. परंतु, त्यासाठी ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही साखर नसलेल्या दूधामध्ये खजूर उकळून ते दूध पिऊ शकता.

शिळी चपाती खाण्याचे फायदे वाचाल, तर फेकण्याआधी नक्की विचार कराल

खजुर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. खजूरमध्ये ग्लूकोज आणि प्रुक्टोज मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते.

खजुर खाण्याचे इतरही फायदे आहेत

खजूरात फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे खजूर खाल्ल्याने पचनक्रिया नियंत्रणात राहते. तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यासही मदत होते.

शरीरात आयर्न कमी झाल्यास अशक्तपणा येऊ शकतो. खजुरामध्ये आयर्न मोठ्या प्रणामात असतं. त्यामुळे अशक्तपणा दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असते. शरीराला पोटॅशिअम कमी मिळाल्याने ब्लड प्रेशर, हृदय विकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधीत आणखीही समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते.

खजूर खाल्ल्याने कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन बी6 असतात. कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम दोन्हीमुळे हाडे मजबूज होतात.

खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेजी येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.

काजु मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो

काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहता येत.

काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी,के चे प्रमाण अधिक असते. तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाण देखील सर्वाधिक असते. काजू खाल्यामुळे एनर्जी वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होते.

किशमिशच्या मदतीने घरबसल्या मिळवा चमकदार त्वचा

काजूत हेल्थी फॅट्सच प्रमाण अधिक आहे. त्यामुळे डायबिटीस, रक्तदाब, लठ्ठपणा यावर काजू फायदेशीर ठरतात. यात प्रोटीन आणि विटामिनचं प्रमाण देखील जास्त आहे. तसेच काजू खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

काजूमध्ये अ‍ॅनकार्डिक ॲसिड असते. जे शरीरातील ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचण्यास मदत करते. यामुळे रक्तामध्ये ग्लूकोज जात नाही आणि रक्तातील साखर वाढत नाही.

काजू डायबिटीस आणि डायबिटीसपासून जडणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत करते.

काजूचे इतरही फायदे

काजूत आर्यन आणि ओमेगा 3 चे प्रमाण अधिक असल्यामुळे मूड चांगला ठेवण्यात काजू अधिक फायदेशीर आहे.

नैराश्य आणि डिप्रेशनवर देखील काजू रामबाण उपाय आहे. मासिक पाळीच्या दिवसांत होणाऱ्या मुडस्विंग्सच्या वेळी देखील काजू खाल्याने चांगला फायदा होतो.

काजूचं सेवन केल्यामुळे कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरत नाहीत. त्यामुळे लिव्हर कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर सारखे आजार आपल्यापासून दूर राहतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी