29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeआरोग्यआणखी चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स.....

आणखी चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स…..

पाककला(Food Taste Better)म्हणजे डिशमध्ये योग्य चव आणि सुगंध देणे. एखादा पदार्थ बनवणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत असते. स्वयंपाक करताना अनेकदा महिलांची खूप घाई होते. एका छोट्या चुकीमुळे संपूर्ण पदार्थ खराब होतो. त्यामुळे चव आणि रंगावर परिणाम होतो. अनेकदा पदार्थमध्ये मसाला, मीठसह काही गोष्टी जास्त पडतात. यामुळे असे पदार्थ कुटुंबातील सदस्यांना अजिबात खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे रोजचे पदार्थ आणखी चविष्ट कसे बनवायचे असा प्रश्न प्रत्येक गृहिणींना पडलेला असतो. त्यासाठी काही खास टिप्स... (Simple Tips To Make Food Taste Better)

पाककला(Food Taste Better)म्हणजे डिशमध्ये योग्य चव आणि सुगंध देणे. एखादा पदार्थ बनवणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत असते. स्वयंपाक करताना अनेकदा महिलांची खूप घाई होते. एका छोट्या चुकीमुळे संपूर्ण पदार्थ खराब होतो. त्यामुळे चव आणि रंगावर परिणाम होतो. अनेकदा पदार्थमध्ये मसाला, मीठसह काही गोष्टी जास्त पडतात. यामुळे असे पदार्थ कुटुंबातील सदस्यांना अजिबात खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे रोजचे पदार्थ आणखी चविष्ट कसे बनवायचे असा प्रश्न प्रत्येक गृहिणींना पडलेला असतो. त्यासाठी काही खास टिप्स… (Simple Tips To Make Food Taste Better)

  • पराठे अधिक चविष्ट बनवण्यासाठी पीठात उकडलेला बटाटा किसून घाला. तसेच, पराठा बनवताना तेलाचा किंवा तूपाचा वापर करण्याऐवजी बटरचा वापर करा अधिक टेस्टी लागतील.
  • मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडेसे तांदळाचे पीठ णि थोडे गरम तेल घातल्यास, भजी अधिक कुरकुरीत आणि चवदार बनतात. तसेच खाण्यापूर्वी भजींवर चाट मसाला टाकावा. त्यामुळे खाण्यास आणखी मजा येते.

    तुळशीच्या बिया आहे शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या

  • भेंडीला जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्यावर थोडेसे मोहरीचे तेल शिंपडा.
  • नूडल्स उकळताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल घाला. उकळल्यानंतर गार पाण्यात ठेवा. त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत.
  • रायतामध्ये हिंग आणि जिऱ्याची पूड घालण्याऐवजी रायत्याला जिरा आणि हिंगाचा तडका द्या
  • राजमा किंवा उडीद डाळ बनवण्यासाठी पाण्यात उकळताना मीठ घालू नये, ते त्वरीत शिजेल. वितळल्यानंतर मीठ घाला.

जाणून घ्या, कडक उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

  • पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी त्याला पीठ लावताना त्यात एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला. यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतात. तसेच पुरीचे पीठ भिजवताना एक चमचा साखर घाला.
  • जर पनीर घट्ट असेल तर चिमूटभर मीठ घातलेल्या पाण्यात पनीर १० मिनिटे ठेवा. पनीर मऊ होईल.
  • तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने भात अधिक पांढरा आणि चवदार होतो.
  • तर या टिप्स तुम्ही फॉलो केलात तर नक्कीच तुमचे पदार्थ चविष्ट होण्यास मदत होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी