31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्रीडाINDvsSA T20I : भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी आफ्रिका संघाने घेतला खास व्यक्तीचा आशिर्वाद

INDvsSA T20I : भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी आफ्रिका संघाने घेतला खास व्यक्तीचा आशिर्वाद

भारतात येण्यापूर्वी खेळाडूंना प्रेरित करण्याच्या उद्देशाने कर्णधार बवुमाने संपूर्ण संघाला खास सहलीवर नेले. ही सहल रॉबेन एरिनची होती. दक्षिण आफ्रिका आणि जगाच्या इतिहासात या बेटाचे महत्त्व काय आहे हे कोणापासून लपलेले नाही. या बेटावर दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि वर्णभेदाविरुद्ध दीर्घकाळ लढणारे नेल्सन मंडेला यांना 18 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता.

दक्षिण आफ्रिकेला 28 सप्टेंबरपासून भारताविरुद्ध टी20 मालिका खेळायची आहे. यासाठी टेंबा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात पोहोचला आहे. टी20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने भारताचा हा दौरा दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचा आहे. कर्णधार टेम्बा बवुमा आणि प्रशिक्षक मार्क बाउचरही याला सहमत आहेत. त्यामुळे भारतात येण्यापूर्वी खेळाडूंना प्रेरित करण्याच्या उद्देशाने कर्णधार बवुमाने संपूर्ण संघाला खास सहलीवर नेले. ही सहल रॉबेन एरिनची होती. दक्षिण आफ्रिका आणि जगाच्या इतिहासात या बेटाचे महत्त्व काय आहे हे कोणापासून लपलेले नाही. या बेटावर दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि वर्णभेदाविरुद्ध दीर्घकाळ लढणारे नेल्सन मंडेला यांना 18 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Proteas Men (@proteasmencsa)

दक्षिण आफ्रिकेचा संघ गेल्या आठवड्यात रॉबेन एरिनच्या सहलीवर गेला होता. कॅप्टन बवुमासाठीही हा प्रवास संस्मरणीय ठरला. भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान या बेटाचा दौरा दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यानी व्यक्त केला. या सहलीबद्दल बवुमा म्हणाला की, “रॉबेन आयलंडची सहल आपल्या संघातील अनेकांसाठी प्रेरणादायी होती. मागच्या वेळी मी तिथे गेलो होतो तेव्हा मला वाटतं मी साधारण आठ वर्षांचा होतो, त्यामुळे मला त्या ट्रिपबद्दल फारसं काही आठवत नाही. हा एक नवीन अनुभव असल्यासारखा वाटला आणि याने निश्चितच माझ्या उद्देशाची जाणीव अधिक बळकट केली.”

हे सुद्धा वाचा

Dahiwadi News : युपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी डाॅ. नितीन वाघमोडेंच्या खास टिप्स

Two NCP groups fight: सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बारामतीत दोन गट एकमेकांना भिडले

Shinde government : शिंदे सरकारने काढला गरीबांच्या तोंडातला घास

दुखापतीमुळे माझ्यासाठी 3 महिने कठीण

तो पुढे म्हणाला की, “गेले काही महिने दुखापतीच्या बाबतीत माझ्यासाठी सर्वात कठीण गेले आहेत. हे निश्चितच निराशाजनक होते. माझ्या कोपराची दुखापत कधी बरी होईल हे मला माहीत नव्हते. तो माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या सर्वात कठीण काळ होता. मी आता भारतात आलो आहे. कोपराच्या दुखापतीतून सावरल्यानंतर आता मला बरे वाटत आहे. मी शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला. पण, मला पुन्हा दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची संधी मिळाल्याने मी उत्साहित आहे.” मागील भारत दौऱ्यावर, ज्यात बावुमा कोहलीला दुखापत झाली होती. त्या दौऱ्यात बवुमा धावा करण्यात अपयशी ठरला होता. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्याच्यावर वर्चस्व गाजवलं होते. आता या दौऱ्यात बावुमांना जुना हिशोब चुकता करायचा आहे.

दरम्यान,भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्याचवेळी, दुसरा सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये आणि तिसरा सामना 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये खेळवला जाईल. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ जूनमध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्यानंतर दोन्ही संघांमधील 5 टी20 सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत होती. बंगळुरूमध्ये होणारा शेवटचा सामना पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे या मालिकतेचा निकाल लागू शकला नव्हता. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व रिषभ पंतच्या खांद्यावर होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी