30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeआरोग्यदाढी वाढवण्यासाठी करा दालचिनी आणि लिंबाचा वापर 

दाढी वाढवण्यासाठी करा दालचिनी आणि लिंबाचा वापर 

तरुण आणि वृद्धांमध्ये दाढीचा लूक ट्रेंडमध्ये आहे. ज्या लोकांना दाट दाढी नाही त्यांना या गोष्टीची खूप काळजी वाटते. शरीरात हार्मोन्सच्या कमतरतेमुळे दाढीचे केस वाढत नाहीत. (Cinnamon and Lemon for Beard Growth)

आजच्या काळात सर्वांना परफेक्ट दिसायची ओढ असते. परफेक्ट लुक येण्यासाठी पुरुष किंव्हा महिला नेहमीच धडपड करत असते. महिला तर कपड्यांपासून तर दागिन्यांपर्यंत सर्वच गोष्टींची विशेष काळजी घेते. मात्र, पुरुष खूप साधे असतात. (Cinnamon and Lemon for Beard Growth) त्यांच्यासाठी त्यांची दाढीच सर्वात जास्त महत्वाची असते. तरुण आणि वृद्धांमध्ये दाढीचा लूक ट्रेंडमध्ये आहे. ज्या लोकांना दाट दाढी नाही त्यांना या गोष्टीची खूप काळजी वाटते. शरीरात हार्मोन्सच्या कमतरतेमुळे दाढीचे केस वाढत नाहीत. (Cinnamon and Lemon for Beard Growth)

पावसाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी

टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या कमतरतेमुळे दाढी आणि शरीरावर केस कमी-जास्त प्रमाणात वाढू शकतात. पण ज्या लोकांची दाढी घट्ट आणि ट्रेंडी नसते, ते अनेकदा दाढी वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींचा वापर करतात. मात्र, आता आम्ही अशा लोकांसाठी एक सोपा उपाय घेऊन आलो आहोत. ज्यामुळे दाढी लवकरच वाढणार. दालचिनी पावडर आणि लिंबाचा वापर दाढीच्या चांगल्या वाढीसाठी खूप फायदेशीर मानला जातो. (Cinnamon and Lemon for Beard Growth)

दालचिनी आणि लिंबाचा वापर चांगल्या आणि जाड दाढीसाठी खूप फायदेशीर आहे. याचा नियमित वापर केल्याने दाढीचे केस दाट होतात आणि चांगले दिसतात. (Cinnamon and Lemon for Beard Growth)

तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे वाढू लागली आहेत का? मग आजच करा ‘हा’ व्यायाम

दाढीचे केस दाट करण्यासाठी आणि त्यांना एक परिपूर्ण लुक देण्यासाठी तुम्ही दालचिनी पावडर आणि लिंबाचा रस सहजपणे वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम दालचिनीचे तुकडे घेऊन ते चांगले बारीक करून पावडर बनवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाजारातून दालचिनी पावडरही विकत घेऊ शकता.(Cinnamon and Lemon for Beard Growth)

2 चमचे दालचिनी पावडरमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा. यानंतर ही पेस्ट २ ते ३ मिनिटे फेटून घ्या. आता तुमची पेस्ट तयार आहे. ही पेस्ट दाढीवर जिथे कमी केस आहेत तिथे नीट लावा. सुमारे 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा पूर्णपणे धुवा. (Cinnamon and Lemon for Beard Growth)

दालचिनी आणि लिंबाचा रस लावल्याने चेहऱ्याची छिद्रे उघडतात आणि पेशींमध्ये रक्त प्रवाहही वाढतो. याचा नियमित वापर केल्याने तुमच्या दाढीची वाढ देखील सुधारेल. लक्षात ठेवा, ही पेस्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते वापरणे टाळा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही पेस्ट वापरल्याने तुम्हाला फायदा होईल. (Cinnamon and Lemon for Beard Growth)

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी