35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यWeight Loss | वजन कमी करायचेय? मग ‘या’ गोष्टींचे करा सेवन

Weight Loss | वजन कमी करायचेय? मग ‘या’ गोष्टींचे करा सेवन

टीम लय़ भारी

धावपळीमुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. यामुळे केवळ आपले आरोग्यच बिघडत नाही तर वजनही वाढते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, मात्र याचा परिणाम होतोच असे नाही. तर काही लोक वजन कमी करण्यासाठी जिम किंवा योगा क्लासला जातात. मात्र काही घरगुती उपायांचा अवलंब करुनही आपण आपले वाढते वजन कमी करु शकता किंवा नियंत्रणात ठेवू शकता (want to lose weight then consume these things belly fat will disappear).

लिंबाचे सेवन करा

आपल्याला वजन कमी करायचे असेल तर लिंबू आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकेल. लिंबामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होईल, ज्यामुळे आपले वजन घटवण्यास फायदा होतो. लिंबामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडेंट्स त्वचेला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचविण्यात मदत करतात. हे वजन कमी करण्यास मदत करते. इतकेच नव्हे तर त्यामध्ये आढळणारे घटक पाचन समस्या दूर करण्यात प्रभावी ठरतात. यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. लिंबामध्ये कॅलरींचे प्रमाण खूप कमी असते, तसेच ते चयापचय सुधारते.

जाणून घ्या, काय आहेत देशी तुपाचे फायदे

WhatsApp चॅट तुम्ही लपवू शकता, ही सोपी ट्रिक माहित आहे का?

वेलचीचे सेवन करा

आपल्याला शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करायची असल्यास आपण वेलचीचे सेवनही करु शकता. इतकेच नव्हे तर जेवण जास्त खाल्ल्यानंतर लगेचच एक वेलची खाल्ल्याने तुम्हाला त्रास होणार नाही किंवा अपचनासारखेही वाटणार नाही. वेलची चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

Vidyasagar rao

चक्क कार्यक्रम सुरु असतानाच कार्यकर्ते म्हणाले ‘टरबूज’; एकनाथ खडसे म्हणाले…

Should carbs be completely stopped during weight loss?

दालचिनीचे सेवन करा

आयुर्वेदिक तज्ज्ञांनुसार, अगदी दालचिनीच्या मदतीने तुम्ही बरेच वजन कमी करू शकता. यात बरेच औषधी गुणधर्म आहेत, जे केवळ वजन कमी करण्यातच उपयुक्त ठरत नाहीत, परंतु चयापचय सुधारण्यात देखील मदत करते. खास गोष्ट म्हणजे अन्नाची लालसा नियंत्रित करण्याबरोबरच, ओव्हरईटिंगपासून बचाव करते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी