31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट बनल्या होमाई व्यारावाला

भारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट बनल्या होमाई व्यारावाला

धनश्री धुरी : टीम लय भारी

भारताच्या 20 व्या शतकात हळू हळू बदल होत होते. पुरुष वर्चस्व असलेल्या या देशात महिलांसाठी खाजगी क्षेत्रात मर्यादित स्वरूपात संधी होत्या. महिलांना क्वचितच शिक्षणासाठी आणि सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होण्यासाठी सुट दिली जात होती. या सगळ्यात एका महिलेने धाडस करत अशा क्षेत्रात प्रवेश केला जिथे पुरुषांचे वर्चस्व जास्त होते. होमाई व्यारावाला या त्या धाडसी महिला असून भारताच्या पहिल्या छायाचित्रकार (फोटोजर्नलिस्ट) बनल्या (Homai Vyaravala became India first female photo journalist).

होमाई व्यारावाला यांचा जन्म 9 डिसेंबर 1913 रोजी गुजरातच्या नवसारी येथे एका पारशी कुटुंबात झाला. त्यांनतर त्या आपल्या कुटुंबासमवेत मुंबईला शिफ्ट झाल्या. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर होमाई यांनी मुंबईत बॉम्बे युनिव्हर्सिटी आणि सर. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एका वृत्तपत्रासाठी फोटोग्राफर म्हणून काम करण्यास सुरू केले.

राज्य शासनाचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार पत्रकार संदीप काळे यांना जाहीर

राज्यातल्या पत्रकारांसाठी जितेंद्र आव्हाड सरसावले, मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

सन 1942 मध्ये व्यारावाला यांनी ब्रिटिश इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये नवी दिल्ली येथे काम केले. त्याचबरोबर त्यांनी बॉम्बेच्या ‘The Illustrated Weekly of India’ या मॅगझिनमध्ये काम केले.

होमाई कॉलेजमध्ये शिकत असताना त्या मानेकशॉ व्यारावाला यांना भेटल्या. मानेकशॉ एक फ्रीलान्स फोटोग्राफर होते. होमाई आणि मानेकशॉ यांचा विवाह झाला व त्यांनीच होमाई यांना फोटोग्राफीचे धडे दिले (Homai and Manekshaw got married and taught Homai photography).

Homai Vyaravala became India first female photo journalist
होमाई व्यारावाला

होमाई यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे उत्कृष्ट फोटो काढले होते. सन 1947 साली लाल किल्ल्यावर फडकवलेल्या भारताच्या तिरंगा झेंड्याचे, भारतातून लॉर्ड माउंटबेटनचे परत जाणे यासारखी छायाचित्रे ही त्यांनी टिपली होती. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अंतिम यात्रांचे फोटो सुध्दा त्यांनी काढले होते (He also photographed the last yatras of Mahatma Gandhi and Pandit Jawaharlal Nehru).

मुस्लीम बांधव ‘मोहरम’ का साजरा करतात ? जाणून घ्या कारण

World Photography Day 2021: In Pics, 5 Female Photographers Who Documented Life in India

होमाईंनी अनेक प्रसिद्ध लोकांचे फोटो काढले होते, परंतु नेहरुंचे फोटो काढणे हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा नेहरू मरण पावले होते तेव्हा त्या इतर छायाचित्रकारांपासून स्वतःचा रडवेला चेहरा लपवत होत्या.

Homai Vyaravala became India first female photo journalist
नेहरु एका ब्रिटीश मुत्सद्याच्या पत्नीसाठी सिगारेट पेटवताना

सन 1969 साली होमाई यांचे पती मानेकशॉ यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर होमाई यांनी सन 1970 मध्ये छायाचित्रकार या क्षेत्रातून निवृत्ती घेतली. त्यांनतर त्या गुजरातला कायमच्या शिफ्ट झाल्या.

होमाई यांचे पुरस्कार  

होमाई यांना 2011 साली दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान व पद्मविभूषणाने सन्मानित करण्यात आले होते.  होमाई यांनी 16 जानेवारी 2012 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी झाले.

Homai Vyaravala became India first female photo journalist
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट यांना पद्मविभूषण पुरस्कार देताना

गूगलनेही होमाई यांच्यासाठी डूडल बनवत दिली होती श्रद्धांजली  

भारताच्या पहिल्या महिला चित्रकार होमाई व्यारावाला यांच्या 104 व्या जयंती निमित्त गुगलने डूडल बनवत श्रद्धांजली दिली होती. यावर गुगलने होमाई यांची अनेक जुनी छायाचित्रे काढून त्याला कोलाजचे स्वरूप दिले होते (Google had removed many of Homai old photographs and turned them into collages).

Homai Vyaravala became India first female photo journalist
होमाई व्यारावाला यांना गुगलने दिली श्रद्धांजली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी