29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रसदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला 'मौलिक' सल्ला

सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला ‘मौलिक’ सल्ला

टीम लय भारी

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजून समजत नाही ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कोरोनामुळे ते सुरक्षित यंत्रणेमध्ये राहत होते. मात्र, आता त्यांनी आठवड्यातून किमान तीन दिवस तरी मंत्रालयात यावे. तेव्हाच तुम्हाला महाराष्ट्र समजेल, असा मौलिक सल्ला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे (Sadabhau Khot gave advice to Chief Minister Uddhav Thackeray).

सदाभाऊ खोत यांनी ‘लय भारी’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे ज्यावेळी शिवसेना प्रमुख म्हणून मातोश्रीमध्ये राहत होते. त्यावेळी ते कोणाला भेटायचे हे माहिती नाही. मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी एक सिस्टीम होती. मात्र, ठाकरे यांना समजत नाही ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आता लोकांना भेटायला हवे. कोरोनाच्या संकटामुळे ते सुरक्षित यंत्रणेमध्ये राहत होते. परंतु आता त्यांनी आठवड्यातून किमान तीन दिवस तरी मंत्रालयात यावे. तुम्ही मंत्रालयात बसाल तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र समजेल. महाराष्ट्रातील प्रश्न समजतील, असा सल्ला सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

पुरामुळे कोकणातला मच्छिमार आर्थिक संकटात : सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Sadabhau Khot advice Chief Minister Uddhav Thackeray
सदाभाऊ खोत यांनी ‘लय भारी’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली

कोरोनामुळे मुख्यमंत्री लोकांना भेटण्यासाठी टाळाटाळ करत होते. त्यामुळे त्यांची भेट घेण कठीण होते. आता हळूहळू मुख्यमंत्री कोरोनाच्या बंगल्यातून कधीतरी बाहेर येत आहेत. तर आता त्यांनी लोकप्रतिनिधींना भेटायला हवे. त्यांची पत्र घ्यायला हवीत, सामान्य जनतेचे प्रश्न समजून घ्यायला हवेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात यायला हवे. मंत्रालयात आले तर, महाराष्ट्रातील प्रश्न समजतील. महाराष्ट्रातील प्रश्न नाही समजले तर धोरण समजणार नाही. मग जे धोरण ठरेल ते एसीमधल्या थंड हवेत घेतलेले धोरण असणार. सर्वसामान्य जनता ही करपलेल्या चेहऱ्याची आहे. त्यामुळे थंड हवेत घेतलेले निर्णय हे करपलेल्या चेहऱ्याच्या जनतेच्या हिताचे ठरणार नाहीत, असे सदाभाऊ खोत म्हणाले (Sadabhau Khot said the Chief Minister should meet the people).

Sadabhau Khot advice Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री कोरोनाच्या बंगल्यातून कधीतरी बाहेर येत आहेत

चोर चोर मावसभाऊ, अर्ध अर्ध वाटून खाऊ : सदाभाऊ खोत

Don’t summon third wave of corona: CM Uddhav Thackeray

देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होत, त्यावेळी ते दिवसभरातील बराच वेळ ते मंत्रालयात बसून काम करत असायचे. लोकांचे प्रश्न जाणून घेत असायचे. मध्यरात्री फडणवीस आमदार- खासदारांच्या भेटी घेत होते, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी