35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनजुही चावला झाली अलिबागकर,विकत घेतलेल्या जागेची किंमत घ्या जाणून

जुही चावला झाली अलिबागकर,विकत घेतलेल्या जागेची किंमत घ्या जाणून

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाचा आज वाढदिवस आहे. जुहीचा आज ५४ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि जुही हे बेस्ट फ्रेंड्स आहेत(juhi chawla buys new bunglow in alibaug)

जुहीने शाहरुखचा मुलगा आर्यन खानसाठी सत्र न्यायालयात १ लाख रुपयांच्या बेल बाँडवर स्वाक्षरी केल्यामुळे ती चर्चेत होती. दरम्यान, जुहीने अलिबागमध्ये एक नवा प्लॉट विकत घेतल्याची बातमी समोर येत आहे.

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा !: नसिम खान

जुहीने अलिबागमध्ये प्लॉट विकत घेतल्याची माहिती ‘झॅपकी डॉट कॉम’च्या हवाल्याने ‘मनी कंट्रोल’ने हे वृत्त दिलं आहे. जुहीने .३०६० हेक्टर्सची जमीन अलिबागमधील मापगावला घेतली आहे. ही जमीन जुहीने १.८९ कोटी रुपयांमध्ये विकत घेतली आहे. या जमीनीच्या व्यवहारासाठी जुहीने ११.३४ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली.

२२ ऑक्टोबरला या व्यवहाराच्या कागदपत्रांची नोंदणी झाल्याचे म्हटले जाते. जुहीने या व्यवहाराविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. तर, सप्टेंबर महिन्यात बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती रणवीर सिंहने अलिबागमध्ये २२ कोटी रुपये देत एक बंगला विकत घेतला आहे. द एव्हरस्टोन ग्रुपचे राजेश जग्गी यांच्या मालकीचा हा बंगला होता.

चक्क एका संस्थापकाने स्वत:ला थोबाडीत मारण्यासाठी महिलेला ठेवले कामावर

Happy Birthday, Juhi Chawla: Interesting Facts About the Qayamat Se Qayamat Tak Actress

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी