31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजशाहीद आफ्रिदीने जावयाला सुनावले खडेबोल, पाकिस्तानचा पराभव शाहीन आफ्रिदीमुळेच

शाहीद आफ्रिदीने जावयाला सुनावले खडेबोल, पाकिस्तानचा पराभव शाहीन आफ्रिदीमुळेच

टीम लय भारी

टी- 20 विश्वचषक स्पर्धेत सेमी फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवत 5 विकेट्सनी विजय मिळवला. या पराभवावर पाकिस्तानच्या माजी गोलंदाज शाहीद आफ्रिदी याने आपला जावई व पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीला खडेबोल सुनावले आहे (Shahid Afridi angry on his son in law).

शाहीद आफ्रीदीने सांगितले की, पाकिस्तानच्या पराभवामागचे कारण हसन अलीने सोडलेली कॅच नसुन शाहीनची ओव्हर असल्याचे म्हटले आहे. हसने कॅच सोडली, त्यानंतर शाहीनने 3 षटकार खाले हे काही बरोबर नाही. मी शाहीनपासुन खूश नाही. त्याला साधी यॉर्कर टाकण्याची अक्कल नाही. असे म्हणत शाहीदने शाहीन आफ्रिदीला सुनावले आहे.

जुही चावला झाली अलिबागकर,विकत घेतलेल्या जागेची किंमत घ्या जाणून

कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा !: नसिम खान

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने हातातोंडाशी आलेला सामना गमावला. मुख्य म्हणजे शाहीनकडून टाकण्यात आलेलं 19 वं षटक पाकिस्तानला महाग पडले. या षटकात शाहीनने तब्बल 22 धावा देत सामना गमावला.

Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, 64MP बॅक, 50MP फ्रंट कॅमेरासह जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

‘He should have used his head, not that sort of bowler to be hit like that’: Shahid Afridi lashes out at Shaheen Afridi

पाकिस्तानने सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. 100 धावा होण्यापूर्वीच त्यांचे 5 गडी बाद झाले होते. परंतु क्रिजवर आलेल्या मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिसने दमदार फंलदाजी करत पाकिस्तानवर विजय मिळवला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी