31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयलगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, कंगनाचा पद्मश्री...

लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, कंगनाचा पद्मश्री काढून घ्या; नवाब मलिक संतापले

टीम लय भारी

मुंबई: अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निषेध नोंदवला आहे. लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है, असं सांगतानाच कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे (Nawab Malik taunt’s actress Kangana Ranaut).

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. 1857 पासून या देशात स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं. त्यानंतर लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली. गांधींनी मोठा लढा दिला. शेवटी ब्रिटीशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर एक अभिनेत्री मलाणा क्रिम घेऊन ओव्हर डोस झाल्यावर काही तरी बोलत आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री मागे घेतला जावा. या अभिनेत्रीने करोडो भारतवासियांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांना अटक करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

नवाब मलिकांचे क्रांती रेडकरच्या बहिणीवर गंभीर आरोप, वानखेडेंनी दिले यावर स्पष्टीकरण

‘नारायण राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात‌ राहिलेले नाहीत’ नवाब मलिकांचे नारायण राणेंना खरमरीत प्रत्युत्तर

माजी मंत्र्याकडून मंदिराच्या जमिनीचा घोटाळा

यावेळी त्यांनी मागच्या सरकारमधील एका मंत्र्यावरही गंभीर आरोप केला. फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याने मंदिराच्या जमिनीचा घोटाळा केला होता. त्याचे पुरावे मी लवकरच देणार आहे. भाजपवाले कसे घोटाळे करत होते हे राज्यातील जनतेला दिसेल, असं त्यांनी सांगितलं.

ईडीच्या कारवायांना घाबरणार नाही

यावेळी त्यांनी कालच्या ईडीच्या छापेमारीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. वक्फ बोर्डावर छापे पडले नाही. वक्फ बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर छापे पडले आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो. पुण्यातील एक ट्रस्ट आहे. ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्टवर कारवाई झाली. त्यात पुण्यात एमआयडीसीत पाच हेक्टर 51 आर जमीन अॅक्विजेशन करून ऑफिसरकडे पैसे जमा केले.

“बात निकलेगी तो फिर…”, नवाब मलिक यांच्या नव्या ट्वीटमुळे पुन्हा खळबळ

High court to Nawab Malik: Did you verify the information before posting it on Twitter?

इम्तियाज हुसैन शेख आणि इतर ट्रस्टींनी त्यांना 7 कोटीच्या 76 लाख 98 हजार 250 रुपये ताब्याचे पैसे दिले. मात्र कागदपत्रानुसार 9 कोटी 64 लाख 42 हजार 500 रुपये हे अॅक्विजेशनचे पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे जमा होते.

एका बनावट कागदपत्राद्वारे ही रक्कम आपल्या अकाउंटमध्ये घेतले. त्यानंतर वक्फ बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर जी एनओसी त्यांनी दाखल केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी पुण्याचे ज्वॉइंट सीईओ खुसरो यांच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2021 रोजी पुण्याच्या बंड गार्डनमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर पाच लोकांना अटक झाली.

त्यात चांद रमजान मुलानी, इम्तियाज महम्मद हुसैन शेख, अॅड कलिम सय्यद, राजगुरू आणि कांबळे आदींना अटक करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ईडीच्या कारवायांना मलिक घाबरणार नाही. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी