34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्ररेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल

रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल

टीम लय भारी

कराड : रेठरे बुद्रुक, कराड येथील कृष्णा नदीवर ४५ कोटी रुपये खर्चाचा नवीन पूल उभारला जाणार आहे. व जुन्या पुलाची दुरुस्तीही होणार आहे. या दोन्ही कामांना शासनाने प्राधान्य दिले आहे. दोन्ही पुलाच्या कामी एकूण 51 कोटी रुपये खर्च होणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस जुना पूल दुरुस्त होईल. व त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल. व नवीन पुलाचे दोन वर्षात काम पूर्ण होणार आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली (Krishna river to build bridge of 45 crore).

आ. चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवर नवीन पुल बांधला जाणार व जुन्या पुलाची दुरुस्ती होणार आहे. नवीन पुलासाठी जमीन धर तपासणीचे काम नुकतेच सुरू झाले आहे. या कामाची आ. चव्हाण यांनी आज सकाळी पाहणी केली.

रयत शिक्षण संस्थेकडून सरकारला २.३६ कोटीची मदत, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला धनादेश !

समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न

यावेळी कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव, उपअभियंता ए. जे. हुद्दार, शाखा अभियंता डी. एन. जाधव, कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, पैलवान नानासाहेब पाटील, नरेंद्र नांगरे – पाटील, शिवाजीराव मोहिते, जे. डी. मोहिते, मदनराव मोहिते, अमरसिंह मोहिते, कृष्णत चव्हाण – पाटील, कराड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. शोभाताई सुतार, बिपीन मोहिते, धनंजय मोहिते, शरद पाटील, राम मोहिते, धनाजी शिंदे, देवदास माने, विनोद पाटील, महेश कणसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सुरुवातीस बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आ. चव्हाण यांनी कामाचा आढावा घेतला. नवीन पुलाचे 20 मीटरचे 15 गाळे तयार होवून तो सद्याच्या पुलापेक्षा 12 फूट उंच होणार आहे. त्याचा पाया भक्कम असेल. व तो तयार झाल्यानंतर त्याची भार क्षमता चाचणी केली जाणार आहे. येत्या मे अखेरीस जुना पूल दुरुस्त होईल. असे अधिकाऱ्यांनी आढाव्यात नमूद केले.

रोहित पवारांनी जाहीर केला ध्वजपूजनाचा मार्ग व वेळ

Krishna river
कृष्णा नदीवर नवीन पुल बांधला जाणार व जुन्या पुलाची दुरुस्ती होणार आहे

Krishna River Management Board to meet today to discuss flow of funds, water allocation

आ. चव्हाण म्हणाले, जुना पूल 6 कोटी रुपये खर्चून दुरुस्त होणार आहे. तो मे अखेरीस पूर्ववत होईल. नवीन पुलाचे मद्रास येथील आयटी तज्ञांनी डिझाईन केले आहे. तो पूल उंची होवून अद्ययावत होणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर जुना व नवीन हे दोन्हीही पुल वाहतुकीस उपयुक्त ठरणार आहेत. त्यावर एकेरी वाहतूक होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी