31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयसत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही : छगन भुजबळ

सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही : छगन भुजबळ

टीम लय भारी

मुंबई : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांवर महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणाबाबत खटला नोंदवला गेला होता. सव्वादोन वर्षांनंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्याबद्दल त्यांनी ट्विटरवरून न्यायालयाबाबत आपले मत मांडले आहे (Chhagan Bhujbal arrested in a case of Home and Civil Supplies).

या प्रकरणी सव्वादोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले,अनेक खोटेनाटे आरोप झाले तसेच मीडिया ट्रायलही झाली. हा संपूर्ण संघर्षमय प्रवास छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना उलगडून सांगितला. या कठीण काळात ज्या मंडळींनी सहकार्य केले त्या सर्वांचे भुजबळ यांनी आभार मानले.

रयत शिक्षण संस्थेकडून सरकारला २.३६ कोटीची मदत, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला धनादेश !

‘ घरात बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना घटनाच माहित नाहीत ‘

‘साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए, ये जनता की दुवाएँ है, उन्हे मुक्कमल नहीं होने देती’ या शायरीद्वारे त्यांनी आपला आनंद व्यक्त केला तसेच जनतेच्या आशीर्वादामुळे या प्रकरणातून आमची निर्दोष मुक्तता झाली असल्याचे ते म्हणाले.

आम्ही निर्दोष आहोत हे आदरणीय शरद पवार साहेबांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व नेत्यांना माहीत होतेच. तसेच राज्याच्या मा. मुख्यमंत्र्यांनाही हा विश्वास होता, त्यामुळेच त्यांनी मला मंत्रिमंडळात जागा दिली असेही ते यावेळी म्हणाले.

समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांवर महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणाबाबत खटला नोंदवला गेला होता

Relief For Maharashtra Minister Chhagan Bhujbal In Corruption Case

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी