31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयसाताऱ्यात दोन राजे समर्थकांमध्ये राडा, नगरसेवकासह टोळीवर गुन्हे

साताऱ्यात दोन राजे समर्थकांमध्ये राडा, नगरसेवकासह टोळीवर गुन्हे

टीम लय भारी

सातारा : साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले समर्थकांमध्ये जोरदार सशस्त्र राडा झाला. याप्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथदारांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे (Udayanraje Bhosale and Shivendra Bhosale supporters fight with each other).

या राड्यात ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. दरम्यान, या सर्व घटनेनंतर परिसरासह खासगी रूग्णालया बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

छगन भुजबळांच्या विरोधात अंजली दमनिया हायकोर्टात जाणार

‘ घरात बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना घटनाच माहित नाहीत ‘

बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, शैलेश बडेकर, निखिल किर्तीकर यांच्यासह इतर अनोळखी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सनी मुरलीधर भोसले (सर्व रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅकविषयी जय शाह यांनी विराट- रोहितशी केली होती चर्चा

Satara company shows way in creating successful zero-waste business

संशयितांनी गुप्ती, रॉड, कोयता यांचा वापर हल्ल्यासाठी केला असून पिस्तुलचा धाक दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व राडा राजपथावरील पोलिस करमणूक केंद्राच्या गेट परिसरात झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी