33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयरयत शिक्षण संस्थेकडून सरकारला २.३६ कोटीची मदत, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला...

रयत शिक्षण संस्थेकडून सरकारला २.३६ कोटीची मदत, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला धनादेश !

टीम लय भारी

मुंबई : कर्मवीर भाऊराव पाटलांनी गरीब, वंचितांसाठी ज्या शिक्षण संस्थेची कवाडं खुली केली, तीच ही रयत शिक्षण संस्था आशियातील सर्वांत मोठी संस्था म्हणून ओळखली जाते. रयत शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री निधीसाठी 2 कोटी 36 लाख 84 हजार ७५७ रुपयांची मदत केली आहे (Rayat Shikshan Sanstha president Sharad Pawar hands over check to CM).

या निधीच्या रकमेचा धनादेश रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. या निधीचा वापर कोरोना विरोधात महाराष्ट्राला लढण्यात केला जाणार आहे.

‘ घरात बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना घटनाच माहित नाहीत ‘

रोहित पवारांनी जाहीर केला ध्वजपूजनाचा मार्ग व वेळ

रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाचे वेतनाचे योगदान दिले आहे.हा समारोह वर्षा निवास येथे पार पडला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.
या संस्थेची स्थापना महाराष्ट्रात २०१७ साली झाली. ४१ महाविद्यालये, ४३९ हायस्कुले, कॉलेजच्या मुलांसाठी २७ वसती गृहे, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७ शेती महाविद्यालये, ५ तंत्र विद्यालये, ५ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ८ डी.एड. महाविद्यालये, ४५ प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, शाळेल्या मुलांसाठी ६८ वसतिगृहे, ८ आश्रमशाळा, ५८ आयटीआय व इतर. एकूण संस्था ६७९, एकूण विद्यार्थी सुमारे साडेचार लाख व सेवक १६,९४८ आहेत या संस्थेशी संलग्न आहेत.

स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, कमवा आणि शिका या मुल्मंत्रातून तयार झालेल्या अनेक विद्यार्थ्यानी यशाची विविध शिखरे पादाक्रांत केली आहेत. त्याचबरोबर अनेक महत्वाच्या कामांसाठी रयत शिक्षण संस्था नेहेमी देणग्या देते. विद्यार्थ्यांसोबतच समाजाचा विकास करण्यात या संस्थेचं मोठा वाटा आहे.

किरीट सोमय्या यांच्या जिवीताला धोका, म्हणून ‘झेड’ सुरक्षा, भाजपचा दावा

Rayat Shikshan Sanstha
रयत शिक्षण संस्थेकडून सरकारला २.३६ कोटीची मदत

Tata Technologies Partners With Rayat Shikshan Sanstha And Science And Technology Park, Pune To Set Up Centers Of Invention, Innovation And Incubation (CIIIs) In Maharashtra

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी