29 C
Mumbai
Friday, August 25, 2023
घरमहाराष्ट्रअजित पवार आमचेच नेते, शरद पवारांचे धक्कादायक विधान; पक्षात कोणतीही फूट नसल्याचा...

अजित पवार आमचेच नेते, शरद पवारांचे धक्कादायक विधान; पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा

अजित पवार हे आपलेच नेते असून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात कुठल्याही प्रकारची फूट पडली नाही, असे खळबळजनक विधान राष्ट्रवादिचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आपल्या कोल्हापूर दौऱ्या आधी बारामती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे व्यक्तव्य केले.

शरद पवार यांच्या या विधानामुळे राजकीय विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

याआधी, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अशाच प्रकारचे विधान करून संभ्रमित केले होते. गुरुवार २४ ऑगस्ट रोजी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी , “राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारची फूट पडली नसून अजित पवार हे आमचेच नेते आहेत,” असे व्यक्तव्य केले होते.

त्याच पार्श्वभूमीवर, शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “अजित पवार आमचेच नेते आहेत. त्यात कुठलाही वाद नाही. जर पक्षातील एखादा गट देशपातळीवर वेगळा झाला तर त्याला फूट म्हटलं जातं. पण आमच्या पक्षात अशी स्थिती नाही.”

हे ही वाचा 

अंगणवाडी इमारतींचे प्रश्न सुटेनात, आता झेडपी शाळांच्या खोल्यांचा वापर करण्याचा विचार

राज्यात कांदा प्रश्न चिघळणार, कांदा करणार सरकारचा वांदा

अजित पवार परत येतील का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या….

“काही लोकांनी पक्ष सोडला किंवा वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी तो निर्णय घेतला म्हणजे त्याला फूट म्हणता येणार नाही, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे,” असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांच्या या गुगलीमुळे अनेकजण बुचकळ्यात पडले असून आपल्या सभेतील भाषणात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी