33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रअनिल गोटे यांच्या नावाने शरद पवारांवर टीका करणारे व्हायरल झालेले पत्र खोटारडे!

अनिल गोटे यांच्या नावाने शरद पवारांवर टीका करणारे व्हायरल झालेले पत्र खोटारडे!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात लिहिलेले एक पत्र समाज माध्यमांत व्हायरल झाले आहे. मात्र खोडसाळपणा करत २०१७ सालच्या जून्या पत्रात खाडाखोड करत हे पत्र व्हायरल केले असल्याचे अनिल गोटे यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

अनिल गोटे हे उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे प्रबळ नेते म्हणून ओळखले जातात. राज्याच्या राजकारणात देखील अनिल गोटे यांची आक्रमक नेता अशी ओळख आहे. मात्र राष्ट्रवादीतीलच काही नेत्यांनी गोटे यांना बदनाम करण्यासाठी जुने पत्र व्हायरल केल्याची चर्चा आहे. अनिल गोटे यांचे कार्यकर्ते सोमनाथ चौधरी यांनी लय भारीशी बोलतांना सांगितले की, रणजीत भोसले यांनी अनिल गोटे यांच्या पत्रात खाडाखोड करुन हे पत्र समाज माध्यमांमध्ये व्हायरल केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीती गटबाजी समोर आल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात होत आहे.

हे सुद्धा वाचा

50 आमदारांसह मुख्यमंत्र्यांची अयोध्यावारी!

अहमदाबादचे नामांतर कर्णावती व्हावे, अशी सावरकर यांची इच्छा

मोबाईल चोरीला गेलाय? ‘हे’ काम वेळीच करा अन्यथा तुमचा डेटासुद्धा…  

अनिल गोटे यांच्या नावाने लिहिलेले पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर गोटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानतंर गोटे यांच्या कार्यकर्त्यांनी हा खोडसाळपणा असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. अनिल गोटे यांच्या नावाने पवारांवर टीका केल्याचे पत्र राष्ट्रवादीतीलच पदाधिकाऱ्याने व्हायरल केल्यामुळे धुळ्यातील गटबाजी समोर आली आहे. राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील गोंधळाचे वातावरण निर्मान झाले असून. काहीजण गोटे यांच्या विरोधात धुप्यापद्धतीने त्यांना बदनाम करण्यासाठी गलिच्छ राजकारण करत असल्याचे गोटे यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी