31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमोबाईल चोरीला गेलाय? 'हे' काम वेळीच करा अन्यथा तुमचा डेटासुद्धा...
Array

मोबाईल चोरीला गेलाय? ‘हे’ काम वेळीच करा अन्यथा तुमचा डेटासुद्धा…

सध्याच्या काळात स्मार्टफोन प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची बाब झाला आहे. सध्या मोबाईलच्या वाढत्या मागणीप्रमाणेच मोबाइल चोरीचेही प्रमाण वाढले आहे. मोबाइल चोरी झाल्यामुळे आपले आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय आपला खाजगी डेटा आणि फोनमध्ये असलेली खूप महत्वाची अशी माहिती सुद्धा त्यासोबत चोरी जाण्याची भीती असते. आता फोन केवळ कॉल करण्यासाठी नाही, तर त्यात अनेक सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्स त्याचे डिटेल्स सेव्ह असतात. त्यामुळे फोन चोरी झाल्यास, असा महत्त्वाचा डेटा सुरक्षित राहण्यासाठी फोन लगेच ब्लॉक करणं अतिशय महत्त्वाचं आहे.

त्यासाठी राज्य सरकारने देखील पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने CEIR या पोर्टलची निर्मिती केली आहे.
तुमचा मोबाईल चोरी झाल्यास अथवा हरवल्यास तुम्हाला काही गोष्टी वेळीच कराव्या लागतील. त्याचप्रमाणे या कार्यात लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सायबर पोलिसांच्या वातीने करण्यात आले आहे.

मोबाईल चोरीला गेलाय? 'हे' काम वेळीच करा अन्यथा तुमचा डेटासुद्धा...

1) प्रथम पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी लागेल.
2) तुमचं सिम कार्ड ब्लॉक करावं लागेल आणि त्याच नंबरच सिम कार्ड घेऊन ते चालू करावं लागेल. CEIRला तोच नंबर द्यावा लागेल.
3) http:www.ceir.gov.in/Home/Index.jsp
या वेबसाईटवर संपर्क साधावा.
4) Blok Stolen/Lost Mobile यावर क्लीक करून आवश्यक ती माहिती भरावी आणि submit वर क्लिक करावे.
5) वेबसाईटवर खालील कागदपत्रे जोडवीत सॉफ्ट कॉपीची साईझ 500kb पेक्षा कमी असावी.
* पोलीस स्टेशनला केलेल्या तक्रारीची प्रत
* मोबाईल खरेदी केल्याचं बिल
* कोणतंही सरकारी ओळखपत्र जोडावे
6) यावर आपल्याला तक्रार नोंदवल्याचा रिक्वेस्ट नंबर मिळेल
7) हरवलेला मोबाईल activ/on झाल्याची माहिती पोर्टलद्वारे रजिस्टर मोबाईलद्वारे तुम्हाला smsद्वारे लगेच मिळेल. आणि ती माहिती नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवायची आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल लगेच तुम्हाला परत मिळेल.

हे सुद्धा वाचा: 

सावधान; मोबाईल खिशात असताना फेसबुक ऐकते तुमचे बोलणे!

मोदी सरकारचा चीनवर डिजिटल स्ट्राईक, ४३ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी

भारतीयांना परवडणारे तंत्रज्ञान विकसित करुन मारुती-सुझुकीचा ई- वाहनांची निर्मिती करण्याकडे कल

Stolen Mobile, lost phone, Stolen Mobile will be recovered from CEIR, CEIR Govt Application for lost phone

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी