31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeव्हिडीओअहमदाबादचे नामांतर कर्णावती व्हावे, अशी सावरकर यांची इच्छा

अहमदाबादचे नामांतर कर्णावती व्हावे, अशी सावरकर यांची इच्छा

अहमदाबाद Vs कर्णावती हा वादही जुनाच आहे. सावरकरांनी 63 वर्षांपूर्वी अहमदाबाद शहराचे नाव बदलून ते कर्णावती करावे, अशी मागणी केली होती. नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेतील सर्वात मोठ्या अहमदाबाद शहराच्या नामांतराची मागणी होत आहे. भाजपशी संबंधित आरएसएस, अभाविप  विद्यार्थी संघटनेकडूनच ही मागणी होत आहे.

अहमदाबादचे नामांतर कर्णावती व्हावे, अशी सावरकर यांची इच्छा होती. देशात भाजपकडून नाव बदलाचे वारे जोरात वाहविले जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदाबाद शहराचे नाव कर्णावती किंवा अमदावद म्हणून का बदलले जात नाही, असा प्रश्न देशभर उपस्थित केला जातो. पंतप्रधान मोदी आणि भाजप हे सावरकरांची इच्छा केव्हा पूर्ण करणार, हाही सवाल केला जातो.

अनेकांच्या मते, गावांची, रस्त्यांची नावे बदलणे हा फडतूसपणा आहे. यशाने इतिहास पुसला जाणार नाही. मात्र, भाजपाने  देशभर राजकारणासाठी नामांतर वाद निर्माण करून ठेवला आहे. चीनच्या ड्रॅगन फ्रूटचे नावही या अतिउत्साही मंडळीना कमळफूल हवे आहे. महाराष्ट्रात औरंगाबादचे नाव बदलले, मग बिहारमधील औरंगाबादचे काय? मोदींच्या अहमदाबादचे काय, असे प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.

 

अहमदाबाद Vs कर्णावती हा वादही जुनाच आहे. सावरकरांनी 63 वर्षांपूर्वी अहमदाबाद शहराचे नाव बदलून ते कर्णावती करावे, अशी मागणी केली होती. त्या अर्थाने शहरे आणि सांस्कृतिक, ऐतिहासिक प्रतिकांची नावे बदलण्याचे राजकारण या देशात सावरकरांनीच सुरू केले, असे म्हणता येईल.

हे सुद्धा वाचा :

मोठी बातमी : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव झाले; केंद्र सरकारने दिली मंजुरी !

मी औरंगाबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार ! इम्तियाझ जलील

भीती खरी ठरली! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर आता शिंदे-फडणवीस सरकारची नवी खेळी

राष्ट्रपती भवनात असलेल्या मुघल गार्डनचे नाव बदलून केंद्र सरकारने ते अमृत उद्यान असे केले. तेव्हापासून नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेतील सर्वात मोठ्या अहमदाबाद शहराच्या नामांतराची मागणी होत आहे. भाजपशी संबंधित आरएसएस, अभाविप  विद्यार्थी संघटनेकडूनच ही मागणी होत आहे. त्यासाठी मध्यंतरी मोहीम राबविण्याच्या घोषणाही झाल्या. मात्र, इतर राज्यातील शहरांच्या नामांतरात तत्परता दाखविणारे, मोदी-शाह ही गुजराती माणसे सर्वोच्चस्थानी असलेले केंद्र सरकार, अहमदाबादबाबत मात्र आपली “गतिशील”ता हरवून बसलेले आहे. स्वत:च सुरू केलेले नामंतराचे राजकारण अहमदाबादबाबत भाजप आणि मोदींच्या अंगाशी येत आहे. आता मोदी-शाह आणि भारातीय जनता पक्ष अहमदाबादचे नामांतर कधी करतेय, त्याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Ahmedabad renamed Karnavati, Ahmedabad Vs Karnavati, Savarkars Desire, Karnavati Savarkars Desire, savarkar rss abvp

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी