31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रहट्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल; अनिल परबांचा इशारा

हट्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल; अनिल परबांचा इशारा

टीम लय भारी

मुंबई : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी गंभीर इशारा दिला आहे. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तर काही एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत(Anil Parab: Action must be taken against the employees who are stubborn)

त्यामुळे हट्ट करून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून देण्यात आलाय.

अनिल परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा,म्हणाले…

कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव; आज परिवहन मंत्री आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळात पुन्हा बैठक

गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी कर्मचारी राज्यव्यापी संपावर होते. हा संप 15 दिवस चालल्यानंतर राज्य सरकारनं ऐतिकासिक 41 टक्के पगारवाढ जाहीर केली. आणि संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं.

परिवहन मंत्री अनिल परब काय म्हणाले?

ST संपात फुटीची चिन्हे ; कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा

MSRTC employee stir: After historic salary hike, Anil Parab warns ‘strict action’ if strike not called off

पगारवाढीचा प्रस्ताव कामगारांच्या हीतासाठीच

12 ते 13 हजार कर्मचारी कामावर परतले

कोरोनामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिकट

 लोकांना वेठीस धरू नका, लोक दुसऱ्या पर्यायाकडे वळत आहेत

तंटपुंडे पगार असणाऱ्यांचे पगार वाढवले

दर महिन्याला 10 तारखेच्या आधी पगाराची हमी

विलीनीकरणाबाबत समितीचा अहवाल मान्य करणार

बाकीच्या राज्यांच्या बरोबरीनं एसटी कर्मचाऱ्यांना पगार

काही कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम

हट्ट करून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

परबांच्या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद मिळणार?

एसटी डबघाईला आली आहे, तिला खाईत लोटू नका असंही परिवहन मंत्री म्हणालेत. आम्ही गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, गुणरत्न सदावर्ते या सर्वांशी चर्चा केली आहे, मात्र सदावर्ते विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी कोर्टात लढावं, आमचं काही म्हणणं नाही असंही परब म्हणालेत.

न्यायलयीन प्रक्रियेचा वेळ सदावर्ते कमी करु शकतात का? असा सवालही परबांनी केलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी हट्ट न करता कामावर हजर व्हावं असं आवाहन अनिल परबांनी केलंय. त्यामुळे आता परबांच्या आवाहनाला एसटी कर्मचारी किती प्रतिसाद देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी