30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपालख्यांच्या आगमनासोबत भरणार वैष्णवांचा मेळा; मुख्यमंत्री येणार पंढरीत

पालख्यांच्या आगमनासोबत भरणार वैष्णवांचा मेळा; मुख्यमंत्री येणार पंढरीत

आज हरपलं देहभान
जीव झाला खुळा बावळा
पाहान्या गा तुझ्या लोचनात
भाबड्या लेकरांचा लळा……
आषाढी सोहळ्यासाठी मजल दरमजल करत लाखों वारकरी विठुरायच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही वारीची परंपरा आजही उत्साहात जोपासली जाते. माऊली तुकरामांच्या नामाचा जयजयकार करत संत शिरोमणि ज्ञानेश्वर महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत सोपानदेव, यांच्या सहअनेक पालखी सोहळे पंढरपूरच्या वेशीवर काल दाखल झाले. हे पालखी सोहळे वाखरी येथील पालखी विमानतळावर विसावले होते. आज ह्या पालखी सोळ्यांचे आगमन पंढरपूरमध्ये होणार आहे. आज सकाळी संताना निमंत्रण देण्यासाठी पंढरपूर येथून संत नामदेव महाराज पालखी पंढरपूरच्या वेशीवर विसाव्याला दाखल झाली असून संत मुक्ताबाई,संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालाख्या देखील विसाव्याला दाखल झाल्या आहेत. वाखरी येथे रिंगण सोहळा पार पडला. तसेच उद्या आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूरमध्ये येणार आहेत.

उद्या आषाढी वारीचा मुख्य सोहळा होणार आहे. पालखी सोहळ्याच्या आदल्या दिवशीच्या म्हणजे दशमीच्या स्नानाला विशेष महत्व आहे. त्यामुळे आजच्या स्नानासाठी मंगळवारपासूनच वारकऱ्यांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे. पालखी सोहळ्यासाठी अनेक भाविक एसटी, रेल्वे, आणि खाजगी वाहनातून पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली आहे.

हे सुद्धा वाचा:

सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकर यांचे नाव, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण

यंदाचा विश्वचषक राउंड रॉबिन पद्धतीने , जाणून घ्या या फॉर्मेटबद्दल

पावसामुळे मुंबई तुंबली; पुढील तीन चार तास जोरदार पावसाचा इशारा

आषाढी एकादशी निमित्त होणारी शासकीय महापूजा उद्या (29 जूनला) पहाटे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईहुन सोलापूरला विमानाने आणि मग हेलिकॉप्टरने दुपारी चार वाजता पंढरपूरमध्ये दाखल होतील. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या पर्यावरण वारीचा समारोह होणार आहे. सायंकाळी पाच वाजता पंचायत समिती येथे आषाढी यात्रा स्वच्छता दिंडीचा समारोह होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी