33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रदुष्काळग्रस्त मराठवाड्यात पावसाचे आगमन; आनंदाच्या जागी दुःखाचे ढग

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पावसाचे आगमन; आनंदाच्या जागी दुःखाचे ढग

मृगा वर्तक : टीम लय भारी

परभणी :- मराठवाडा विभाग नेहेमीच दुष्काळग्रस्त असतो. पावसाच्या पाण्यावर तिथली शेते व जनजीवन अवलंबून आहे. परंतु काल दुपारपासून जो पाऊस सुरू झाला तो अजूनपर्यंत थांबलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून सतत असणाऱ्या पावसामुळे धार रोड, वांगी रोड, एलदरकर कॉलनी, संत गाडगेबाबा नगर, लक्ष्मी नगर परिसरात पाणी साचून घरात आणि दुकानात पाणी साचले आहे (Arrival of rains in drought stricken Marathwada).

पाण्याचा प्रवाह वाढून गुडघाभर पाण्यात कितीतरी जीवन आवश्यक वस्तू घरांतून वाहून गेल्या प्रकरणी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी सदर परिसरातील लोकांना आणि  घरांना भेट देऊन नागरिकांचे सांत्वन केले.

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा

विजय वडेट्टीवारांचा भाजपला खोचक टोला

त्याचबरोबर जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना भेटून नागरिकांना मदत मिळवून देण्याविषयी विनंती केली. कोरोनाचे संकट आणि त्यातच ओल्या दुष्काळामुळे लोकांचे जीवनोपयोगी साधनसामग्री जवळजवळ नष्टच झाली आहे. याबाबतीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा मदत मिळवून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले (He assured the people that help would also be sought from the Chief Minister).

Arrival of rains in drought stricken Marathwada
अतिवृष्टी

तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे, पंकजा मुडेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Heavy rainfall reported in 61 circles of Marathwada

नगरसेवक रितेश जैन, युवा मोर्चा भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, आकाश लोहट, शिवाजीराव शेळके, विनायक कातकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते नुकसानीची पाहणी करताना उपस्थित होते. त्याचबरोबर जायकवाडी कालवा फुटल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत, रेल्वे रुळांवर पाणी गेले आहे अनेक दुकाने घरे पाण्यात जाऊन अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी