32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeटॉप न्यूजभारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा

टीम लय भारी

मुंबई :- भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वात सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्ताय त्यांची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा अशी एकूण 3 आपत्य आहेत (Indian cricketer Yashpal Sharma dies).

यशपाल शर्मा हे त्या भारतीय संघाचे भाग होते, ज्या संघाने भारताला 1983 साली पहिला विश्वचषक मिळवून दिला होता. त्यांचा जन्म पंजाब मध्ये 11 ऑगस्ट 1954 रोजी झाला होता. यशपाल शर्मा यांनी इंग्लंड विरूद्ध लॉर्ड्स मध्ये 1979 मध्ये स्वतःचा कसोटी सामन्यातून डेब्यू केला होता.

विजय वडेट्टीवारांचा भाजपला खोचक टोला

तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे, पंकजा मुडेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

तसेच यशपाल शर्मा हे मधल्या फळीतील दमदार फलंदाज होते. त्यांनी भारतासाठी 37 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी सरासरी 34 सामन्यातून 1606 धावा केल्या होत्या. एकूण 42 वनडे सामन्यात 833 धावा काढल्या. 1983 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत 61 तर, अंतिम फेरीत 89 धावा काढून त्यांनी भारताला यशाच्या दारात उभे केले होते. यशपाल शर्मा हे भारतीय क्रिकेटटीमचे नॅशनल सिलेक्टर पण होऊन गेले आहेत (Yashpal Sharma has also become the national selector of the Indian cricket team).

Indian cricketer Yashpal Sharma dies
यशपाल शर्मा

कोरोना रूग्णांना होतोय ‘बोन डेथ’ नावाचा आजार

When Yashpal Sharma hit a statement six off Bob Willis at the 1983 World Cup

अशा ह्या दिग्गज खेळाडूच्या जाण्याने क्रिकेटविश्वात दुःख पसरले आहे. अनेक नेते, खेळाडू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, लक्ष्मण, त्यांचे सहकारी श्रीकांत यांनी ही त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. आयपीएल संघाने देखील ट्विटर वरून यशपालजी यांना श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केले आहे.

“यशापल शर्मा यांच्या निधनाबद्दल ऐकून मी सुन्न झालो आहे. १९८३ विश्वचषकातील त्यांच्या आठवणी शानदार आहेत. भारतीय क्रिकेट संघासाठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना कायम आहेत.” असे ट्विट सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी