30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रआषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली

आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नींच्या हस्ते करण्यात आली. सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे सुंदर रुप पाहून ते डोळेयात साठवून ठेवत विठुरायाचे आभार मानले. मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली. शेतकरी दांपत्य गेल्या 25 वर्षांपासून वारी करत आहेत.

शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात उशिरा पाऊस झाल्याने यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा आणि राज्यातील जनता सुखी, समाधानी, आनंदी रहावी हेच मागणे विठुरायाच्या चरणी मागितले. यंदा राज्यातील युती सरकारला एक वर्षे पूर्ण होत असून गेल्या वर्षभरात अनेक विघ्न, अडचणी आल्या. मात्र, विठुरायाच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरळीतपणे करता येणे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्यात आला. तसेच पंढरपूर शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी 109 कोटी तर शहारातील रस्ते दुरुस्तीसाठी 108 कोटी रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले आहे. आषाढी वारीत लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनास आले आहेत. पंढरी व परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे विठ्ठल पुजेसारखेच आहे.

हे सुध्दा वाचा:

पुण्यातील तरुणीला हल्यापासून वाचवणाऱ्या तरुणांवर कौतुकाचा पाऊस

यंदाचा विश्वचषक राउंड रॉबिन पद्धतीने , जाणून घ्या या फॉर्मेटबद्दल

यंदाचा विश्वचषक राउंड रॉबिन पद्धतीने , जाणून घ्या या फॉर्मेटबद्दल

विठूरायाच्या पूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारासह उपस्थित होते. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाला ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, खा. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी