28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रएक्साईजच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाणांची केंद्र सरकारला बोचरी टीका

एक्साईजच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाणांची केंद्र सरकारला बोचरी टीका

टीम लय भारी

मुंबई :-  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारात इंधनाच्या दरावरही झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. केंद्र सरकारने एक्साईजमध्ये वाढ करून लूट केल्याची बोचरी टीका अशोक चव्हाण यांनी केली (Ashok Chavan criticized the central government for looting by increasing excise duty).  

दररोज सुरू असलेल्या दरवाढीमुळे रविवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरांनी लिटरला ९५ रुपयांचा, तर डिझेलच्या दरांनी ८६ रुपयांचा टप्पा ओलांडला. देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपार गेले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली आहे. केंद्र सरकारने एक्साईजमध्ये वाढ करून लूट केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे (Chavan has accused the central government of looting by increasing excise duty).

ट्विटरच्या अतिरेकामुळेच भाजपने निवडणुका जिंकल्या; मग आता विरोध का? : शिवसेना

टि्टवरच्या ‘ब्लू टिक’ कडे लक्ष देण्यापेक्षा लसीकरणाकडे अधिक लक्ष द्या; राष्ट्रवादीचा केंद्राला खोचक टोला

अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या असतानाही केंद्र सरकारने (Central Government) त्याचा पुरेसा लाभ देशातील ग्राहकांना मिळू दिला नाही. उलटपक्षी एक्साईजमध्ये (Excise) वाढ करून लूट केली. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पेट्रोल शंभरीपार तर डिझेल नव्वदीत पोहोचले आहे.”

Fuel prices at fresh record highs; Petrol nears Rs 100/litre in Hyderabad and Bengaluru

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ट्विटरवर एक ग्राफ शेअर केला आहे. ज्यामध्ये राज्यातील ३२ जिल्ह्यात पेट्रोल दरवाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वर्षभरात झालेली पेट्रोल दरवाढीची आकडेवारी यामध्ये दिली आहे. ४ मे पासून विसाव्यांदा करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे देशभरातील इंधनाच्या दरांनी ऐतिहासिक विक्रम केला आहे. पेट्रोल लिटरला १०० रुपयांहून अधिक दराने विकले जात असलेले मुंबई हे २९ मे रोजी देशातील पहिले महानगर ठरले होते. मुंबईत आता पेट्रोलसाठी लिटरला १०१.३ रुपये, तर डिझेलसाठी लिटरमागे ९३.३५ रुपये मोजावे लागत आहेत.

चंद्रकांत पाटलांचा राज्यसरकारला सल्ला

इंधन दरवाढीप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला चांगलेच सुनावले आहे. इंधन दरवाढ झाली म्हणून सरसकट केंद्रा सरकारकडे (Central Government) बोट दाखवणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. राज्यासह देशातही काही ठिकाणी इंधनाचे भाव गगनाला भिडलेले आहेत.

इंधन दरवाढीवरुन राज्य सरकार केंद्र सरकारला (Central Government) जबाबदार धरत आहे, हे चुकीचे आहे. त्याचसोबत राज्याने केंद्र सरकारडे बोट दाखवण्यापेक्षा आपला कर कमी करावा म्हणजे इंधनाचे दर कमी होतील, असा सल्लाही पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी