31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा

टीम लय भारी

मुंबई : संपत्तीची माहिती लपवल्यामुळे राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीत सापडले आहेत. बच्चू कडूंना २ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार केली होती(Bachchu Kadu sentenced to two months rigorous imprisonment).

प्रकरण काय?

मंत्री बच्चू कडू यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत आयोगाला संपत्ती विवरणपत्र सादर केले होते. परंतु त्यांनी मुंबईत ४२ लाख ४६ हजारांचा फ्लॅट घेतल्याची माहिती लपवली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान चांदुरबार मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना संबंधित माहिती लपवल्याचे कळते. भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळवलेल्या कागदपत्रातून हा प्रकार उघडकीस आला होता. बच्चू कडू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते, कर्जाची परतफेड करता न आल्याने तो फ्लॅट विकल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला होता.

हे सुद्धा वाचा

बच्चू कडूंनी कानाखाली मारलेले ते अधिकारी कडूंच्याच खात्यात, अधिकाऱ्यांना आता हवीय बदली

भाजपचे नेते हरीशचंद्राची औलाद आहेत का? बच्चू कडू भडकले

बच्चू कडू यांच्या कार्यालयातील अधिकारी सुद्धा ‘कडू’च

MVA is Maharashtra’s political future; no room for Sena- BJP reunion, says Sanjay Raut

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी