35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईअभाविप मुंबईच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस मध्ये आंदोलन

अभाविप मुंबईच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस मध्ये आंदोलन

टीम लय भारी                                 

मुंबई : कोरोना महामारी मध्ये लॉकडाऊन झाल्यापासून सर्व महाविद्यालय व वसतीगृह बंद करण्यात आले होते . राज्य सरकार ने निर्बंध शिथिल केले असून आता सर्व महाविद्यालय व वसतीगृह सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याप्रमाणे महाविद्यालय सुरू ही झाले आहेत पण अजून मुंबई विद्यापीठाने विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे वसतीगृह सुरू केले नाहीत.(ABVP’s agitation in Mumbai University’s Fort Campus)

त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबईच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस मध्ये आंदोलन करण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांना विद्यापीठातुन देण्यात येणारे RLE व RPV या डॉक्युमेंटच्या विषयात हे डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कसे मिळतील यासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने तोडगा काढावे अशी मागणी अभाविपच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाकडे केली.

आंदोलना नंतर मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.सुधीर पुराणिक यांनी अभाविपच्या सर्व मागण्या मान्य करून त्वरित वसतीगृह सुरू करण्यासंदर्भात आदेश काढण्याचे मान्य केले. इतर मागण्यांवर लवकरात लवकर मुंबई विद्यापीठाकडून निर्णय घेतले जातील अशी माहिती त्यांनी दिली

हे सुद्धा वाचा

विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोपाखाली हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक

ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांचा विरोध , राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन

पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी डीबीटी वर अर्ज करण्याकरिता मुदतवाढ

Process to resume Mumbai University offline exams initiated

“गेल्या ३ महिन्यापासून अभाविपने वेगवेगळ्या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन ही आमची मागणी मान्य नाही केल्या म्हणूनच अभाविपने आज आंदोलन केलं. आंदोलना नंतर मागण्या मान्य झाल्या आहेत.” अशी माहिती अभाविप कोंकण प्रदेश सह मंत्री सूरज लोकरे यांनी दिली. “येणाऱ्या काळात विद्यार्थ्याना विद्यापीठ प्रशासनाकडून  त्रास झाल्यास अभाविप विद्यापीठात अजून तीव्र स्वरुपात आंदोलन करेल” असा इशारा देखील सूरज लोकरे यांनी मुंबई विद्यापीठाला दिला.

Abhavip's agitation in Mumbai University's Fort Campus

अभाविप मुंबई महानगर मंत्री सुश्री गौतमी अहिरराव म्हणाल्या, “मुंबई विद्यापीठाला वारंवार सांगून सुद्धा वसतीगृह सुरू केले नाहीत, आज आम्ही अभाविप म्हणून आंदोलन करून वसतीगृह सुरू केले पाहिजे व अन्य काही मागण्या कुलसचिव यांना भेटून सांगितल्या व त्यांनी आश्वासन दिले की त्वरित वसतीगृह सुरू करू व बाकीच्या विषयावर लवकरच तोडगा काढू.”

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी