35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्रीडाImpact Player Concept : बीसीसीआयने सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत आणली 'इम्पॅक्ट...

Impact Player Concept : बीसीसीआयने सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत आणली ‘इम्पॅक्ट प्लेयर’ ची संकल्पना

'इम्पॅक्ट प्लेयर' (Impact Player) ची संकल्पना फुटबॉल, बास्केटबॉल आणि रग्बी या खेळांमध्ये खूप कालावधीपासून प्रचलित आहे. 'इम्पॅक्ट प्लेयर' च्या संकल्पनेनुसार, चालू सामन्यामध्ये दोन्ही संघातील राखीव खेळाडूंपैकी एका खेळाडूला सामन्यात बदली खेळाडू म्हणून खेळण्याची परवानगी दिली जाते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देशात आयोजित केल्या जाणाऱ्या स्थानिक टी-20 स्पर्धांमध्ये प्रायोगिक तत्वावर एक नवीन बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमध्ये (Syed Mushtaq Ali T-20 Trophy)बीसीसीआयने चालू सामन्यामध्ये दोन्ही संघांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या राखीव खेळांडूपैकी एका खेळाडूला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ (Impact Player) म्हणून खेळवण्याची मुभा दिलेली आहे. देशातील स्थानिक स्पर्धा प्रक्षेकांच्या दृष्टीने अधिक आकर्षक, गतिमान आणि रोमहर्षक व्हाव्यात आणि खेळांडूच्या विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळावी या दृष्टीने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ (Impact Player) ची संकल्पना फुटबॉल, बास्केटबॉल आणि रग्बी या खेळांमध्ये खूप कालावधीपासून प्रचलित आहे. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ च्या संकल्पनेनुसार, चालू सामन्यामध्ये दोन्ही संघातील राखीव खेळाडूंपैकी एका खेळाडूला सामन्यात बदली खेळाडू म्हणून खेळण्याची परवानगी दिली जाते.

बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकात नमूद केले की, हया निर्णयामुळे दोन्ही संघातील राखीव खेळाडूंपैकी एका खेळाडूला सामन्यात बदली खेळाडू म्हणून खेळण्याची संधी मिळेल.‍ त्यामुळे सामने अधिक रोमांचक होतील आणि सामना सुरू असताना खेळांडूना वेगळया प्रकारे विचार करून सामन्यामध्ये आपले योगदान करण्याची संधी मिळेल. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ ही संकल्पना फुटबॉल, बास्केटबॉल आणि रग्बी या खेळांमध्ये प्रचलित आहे.

हे सुद्धा वाचा –

Kaun Banega Crorepati : कोल्हापूरच्या कविता चावला बनल्या ‘केबीसी’ च्या 14 व्या मोसमाच्या पहिल्या करोडपति

Raj Thackeray : ‘माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही कसली घाण’

Nandurbar News : तरुणीचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक गोष्टी उघड

बीसीसीआयच्या सूत्रांकडून असे सांगण्यात आले की, ‘इम्पॅक्ट प्लेयर’ ही संकल्पना फक्त आगामी सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमध्ये प्रायोगिक पद्यधतीने राबवण्यात येणार आहे. इंडियन प्रीमीयर लीग, महिला क्रिकेटचे सामने आणि इतर स्थानिक स्पर्धांमध्ये ही संकल्पना राबविण्याचा बीसीसीआयचा सध्या तरी कोणताही विचार नाही.

बीसीसीआयने राज्य क्रिकेट संघटनांना दिलेल्या निर्देशानुसार, एखादया संघाने सामन्यामध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ला संधी दयायची किंवा नाही याचा निर्णय घेणे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. परंतु दोन्ही संघाना ‘इम्पॅक्ट प्लेयर’ संकल्पनेचा वापर करायचा असल्यास, ते त्याचा वापर दोन्ही डावापैकी कुठल्याही डावामध्ये 14 वे षटक सुरू होण्याच्या आधी करण्याची सूट आहे.

संघ कशाप्रकारे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ चा वापर सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमध्ये करू शकतात –

सामना खेळत असलेल्या संघानी जर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ हया संकल्पनेचा वापर करण्याचा निर्णय घेतल्यास तो ‘इम्पॅक्ट प्लेयर’ फंलदाजी किंवा चार षटकाची गोलंदाजी करू शकतो. परंतु एका संघातर्फे फक्त 11 खेळाडूच सहभागी होऊ शकतात. दोन्ही संघाचे व्यवस्थापन ‘इम्पॅक्ट प्लेयर’ची निवड राखीव खेळाडूंमधून किंवा बाद झालेल्या एका खेळांडूमधून करण्याचा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे.

सामना सुरू असताना दोन्हा संघापैकी एका संघाच्या कर्णधाराला किंवा मुख्य प्रशिक्षकाला ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा वापर करायचा असल्यास चालू डावामध्ये एखादा खेळाडू बाद झाल्यावर किंवा दोन्ही डावांच्या मधील ब्रेकमध्ये सामन्याच्या चौथ्या पंचाला त्यांच्या निर्णयाची कल्पना देऊ शकतात.

सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा 11ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.

 

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी