31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeमनोरंजनKaun Banega Crorepati : कोल्हापूरच्या कविता चावला बनल्या 'केबीसी' च्या 14 व्या...

Kaun Banega Crorepati : कोल्हापूरच्या कविता चावला बनल्या ‘केबीसी’ च्या 14 व्या मोसमाच्या पहिल्या करोडपति

कविता चावला यांचे शिक्षण फक्त इयत्ता बारावी एवढेच आहे परंतु त्यांनी वाचनाचा आणि नवनवीन गोष्टी शिकण्याचा छंद अगदी सुरूवातीपासून जोपासला आहे. त्यांनी असे सांगितले की, मला 'कौन बनेगा करोडपति' या शोमध्ये सहभागी व्हायचे होते म्हणून मी नियमितपणे वाचन करणे सुरे ठेवले.

कोल्हापूर जिल्हयातील गृहिणी कविता चावला (Kavita Chawla) या सोनी टेलिविजनवर (Sony Television) प्रसारीत होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपति’ (Kaun Banega Crorepati) नामक रियालिटी शोच्या 14 व्या मोसमातील पहिल्या करोडपति बनल्या आहेत. कविता चावला ‘कौन बनेगा करोडपति’ या शोमध्ये सध्या ‘हॉट सीट’ वर बसून खेळत आहेत आणि त्या शोमधील 7.5 करोडच्या अंतिम प्रश्नाला सामोऱ्या जाणार आहेत. ‘कौन बनेगा करोडपति’ शोच्या 14 व्या मोसमातील पहिल्या करोडपति बनल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना कविता चावला म्हणाल्या की, मला या शोमध्ये इथपर्यंत येण्याचा अतिशय आनंद होत आहे. कौन बनेगा करोडपति च्या 14 व्या मोसमातील पहिली करोडपति झाल्याचा मला खूप गर्व आहे. आता इथपर्यंत पोहोचल्यानंतर अंतिम प्रश्नाचे उत्तर देऊन माझा 7.5 करोड जिंकण्याचा मानस आहे. माझे वडिल‍ आणि माझा मुलगा विवेक माझ्यासोबत मुंबईमध्ये आहे. पंरतु, माझ्या अन्य कुटुंबीयांना मी या शोमध्ये 1 करोड जिंकल्याची कोणतीही कल्पना नाही. मला त्या सगळयांना या बाबतीत सरप्राईज दयायचे आहे.

कविता चावला यांचे शिक्षण फक्त इयत्ता बारावी एवढेच आहे परंतु त्यांनी वाचनाचा आणि नवनवीन गोष्टी शिकण्याचा छंद अगदी सुरूवातीपासून जोपासला आहे. त्यांनी असे सांगितले की, मला ‘कौन बनेगा करोडपति’ या शोमध्ये सहभागी व्हायचे होते म्हणून मी नियमितपणे वाचन करणे सुरे ठेवले. मी 2000 सालापासून हया शोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु मला सारखे अपयश येत होते. मागील वर्षी, मी फास्टेस्ट फींगर फर्स्ट (Fastest Finger First) या राउंडपर्यंत पोहोचले होते पण यावर्षी मला हॉट सीट बसण्याची संधी मिळाली. जेव्हा मी माझ्या मुलाला त्याचा अभ्यास करण्याकरिता बसवत असे तेव्हा मी सुद्धा त्याच्याबरोबर बसून वाचन करीत असे.

हे सुद्धा वाचा –

Raj Thackeray : ‘माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही कसली घाण’

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 72वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा

Chandrakant Patil : खातेवाटपावरून नाराज चंद्रकांत पाटलांनी कबूल केल्या ‘या’ गोष्टी

जेव्हा कविता चावला यांना विचारण्यात आले की, तुम्ही या शोमध्ये जिंकलेल्या 1 करोड रूपयाचे काय करणार आहात त्यावर त्यांनी असे उत्तर दिले, मी एवढे मोठे बक्षीस जिंकल्यानंतर आता माझ्या मुलाला परदेशात शिक्षण घेण्यासाठी पाठवणार आहे. त्यापुढे असे म्हणाल्या की, जर मी अंतिम प्रश्नाचे उत्तर देऊन 7.5 करोड जिंकले तर मी माझ्या परिवारासाठी एक बंगला बांधणार आहे आणि वेगवेगळया देशांमध्ये पर्यटन करणार आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ‘कौन बनेगा करोडपति’ या शोचे सूत्रसंचालन अनेक वर्षांपासून करत आहेत. कोल्हापूरच्या कविता चावला खेळत असलेल्या भागाचे प्रसारण येत्या सोमवारी आणि मंगळवारी सोनी टेलिविजनवर होणार आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी