31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रBhigwan Gram Panchayat  :  ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास एक लाख अकरा हजारांचे...

Bhigwan Gram Panchayat  :  ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास एक लाख अकरा हजारांचे बक्षीस 

टिम लय भारी

भिगवण :  भिगवण ग्रामपंचायत (Bhigwan Gram Panchayat) निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असुन ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध केल्यास भिगवण पत्रकार संघाने एक लाख रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याचे जाहिर केले आहे यामुळे गावातील शांतता अबाधित राहण्यास मदत होणार असुन गावच्या विकासातील अडथळे कमी होणार असल्याचे संघाचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब थोरात यांनी सांगितले.

राज्यातील चौदा हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्याने गाव पुढारी निवडणूकीच्या लढण्यासाठी घरोघरी जाऊन उठ बशा काढु लागले आहेत गावची निवडणूक म्हटले की भावाभावात पहुण्यांच्या विरोधात किंवा शेजाऱ्यांच्या विरोधात लढत असल्याने निवडणूकी नंतरही ताणतणावाचे वातावरण कायम राहते यामधून वादविवादात वाढ होते आणि गावच्या विकासासह वैयक्तिक विकासासही खिळ बसते या बाबीला आळा बसावा या उद्देशाने हा प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे.

शासन आणि निवडणूक आयोग दोघेही ग्रामपंचायत निवडणूकीकडे दुय्यम नजरेने पाहत असल्याने गावच्या निवडणूकीत पॅनल बदलासाठी विशिष्ठ नियम नसल्याने निवडून आल्यानंतर पळवापळवी सारखे गैरप्रकार घडतात गावातील जेष्ठ पॅनल निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करता त्यांना विश्वासात घेतले जात नाही, उपसरपंचाला कसलेही अधिकार नसतात मात्र प्रतिष्ठेसाठी वाद निर्माण होतात त्याचप्रमाणे बोटावर मोजण्याएवढ्या मतामधुन निवडुन आलेला सदस्य भावकीच्या मतांच्या जोरावर पाच वर्ष जनसेवेकडे दुर्लक्ष करतो.

भिगवण ग्रामपंचायत इंदापूर तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न असणारी ग्रामपंचायत आहे पुणे सोलापूर महामार्गावर असणारी अल्पसंख्यांकाचे आणि व्यापारी वर्गाचे गाव अशी ओळख असल्याने  निवडणूकीत अनावश्यक खर्च केला जातो या प्रकाराला आळा बसावा आणि गावात शांतता रहावी यासाठी भिगवण पत्रकार संघाने निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे असे सचिव नितीन चितळकत यांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी