34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या आमदाराने राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर उधळली स्तुतीसुमने

भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर उधळली स्तुतीसुमने

टीम लय भारी

उस्मानाबाद :- सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. त्यातच उस्मानाबादमध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या बैठकीत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी चक्क जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उत्तम कामावरून अक्षरश: स्तुतीसुमने उधळल्याचे चित्र पाहायला मिळाले (BJP MLA Suresh Dhas was seen praising the excellent work of Jayant Patil).

जलसंपदा विभागाच्या बैठकीत भाजपच्या आमदार सुरेश धस यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समोर अक्षरशः हात जोडत आता कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजना तुम्हीच पूर्ण करू शकता अशा शब्दात जयंत पाटील यांची स्तुती केली (BJP MLA praises NCP minister).

जितेंद्र आव्हाडांचे खडेबोल, आता सत्य बाहेर आले सरकार उघडे झाले

ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी केंद्र सरकारला फटकारलं

इतका पॉझिटिव्ह जलसंपदा मंत्री मिळाला आहे तर निधीची कमतरता भासणार नाही. त्यामुळे प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी अधिकार्‍यांनी जास्तीत जास्त मागणी करावी अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवल्याने उस्मानाबाद जिल्हयाला न्याय मिळेल असा विश्वास शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.

कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेत येणारे अडथळे दूर करत २०२३ पर्यंत कोणत्याही परिस्थिती ही योजना पूर्ण करावी अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या घामाचा वास सहन होत नाही, नाना पटोलेंनी काढला चिमटा

Congress’ stand of fighting polls solo will not last: Maharashtra NCP chief Jayant Patil

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उस्मानाबाद पाटबंधारे महामंडळाची आढावा बैठक घेतली. याबैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत माहिती घेतली तसेच प्रकल्पांतील अडचणीही जाणून घेतल्या (Jayant Patil got information about various ongoing projects in Osmanabad district and also learned about the problems in the projects).

कृष्णा मराठवाडा या दोन्ही सिंचन प्रकल्पाला १५०० कोटीचे अतिरिक्त कर्ज उभे करण्याची तरतूद करणार असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी